27.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeनांदेडऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता येणार:डॉ. तोटरे

ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देता येणार:डॉ. तोटरे

एकमत ऑनलाईन

मुखेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत येणा-या अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने परीक्षा देता येतील अशा पद्धतीची माहिती सर्व महाविद्यालयाच्या प्राचार्य यांच्या बैठकीत कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांनी दिल्याची माहिती शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मनोहर तोटरे यांनी दिली.

डॉ.तोटरे म्हणाले की, कोरोनाचे सावट सर्वत्र आहे विद्यार्थी, पालक, कर्मचा-यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. यातच अंतिम वर्षाच्या परीक्षा घेणे अनिवार्य असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यामुळे परीक्षेसंदर्भात दि. ८ सप्टेंबर रोजी कुलगुरू यांनी सर्व प्राचार्य यांची बैठक घेतली व बैठकीमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षे संदर्भात सविस्तर मार्गदर्शन केले. यात विद्यार्थ्यांना त्यांच्याकडे ऑनलाइन परीक्षा देण्यासाठी संगणक, टॅब, मोबाईल इत्यादी साधनांची व्यवस्था असेल तर ऑनलाईन पद्धतीने परीक्षा देता येईल.

ही व्यवस्था नसेल तर कॉलेजला जाऊन ऑफलाइन पद्धतीने परीक्षा देता येईल यासाठी विद्यार्थ्यांना आपल्या महाविद्यालयात जाऊन १५ सप्टेंबर पर्यंत हमीपत्र लिहून द्यायचे आहे याशिवाय एखाद्या विद्यार्थी इतर महाविद्यालयांमध्ये प्रवेश घेतला असेल आणि आता तो गावी राहत असेल त्या विद्याथ्यार्ला त्याच्या गावाजवळ असलेल्या महाविद्यालयांमध्ये ही परीक्षा देता येईल अंतिम वषार्ची परीक्षा ४० गुणांची असेल त्यात बहुपयार्यी प्रश्न असतील या प्रश्नासाठी नकारात्मक गुणांची तरतूद नाही. एखादा विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देताना काही अडचणी उद्भवल्यास किंवा नेटवर्क गेले तर त्या विद्यार्थ्यांना पुन्हा नेटवर्क आल्यानंतर प्रश्न सोडवता येतील त्यांचे नुकसान होणार नाही यासाठी ऑनलाइन परीक्षेची भीती विद्यार्थ्यांनी मनामध्ये ठेवू नये शिवाय ऑफलाइन परीक्षा कॉलेजमध्ये देण्याची सुविधा आहे.

ऑफलाइन परीक्षा घेताना सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्या त्या महाविद्यालयाच्या प्राचार्य असेल असे त्यांनी सांगितले. त्या अनुषंगाने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात येऊन संमती पत्र लिहून देणे आवश्यक आहे. शाहीर अण्णाभाऊ साठे महाविद्यालयाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवार दि. ११ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता महाविद्यालयात उपस्थित रहावे असे आवाहन प्राचार्य डॉ.मनोहर तोटरे यांनी केले आहे.

जिल्ह्यातील उद्योग व्यवसाय वाढीस लागणे गरजेचे : खा.फौजिया खान

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या