33.1 C
Latur
Saturday, February 27, 2021
Home नांदेड परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये परीक्षा : कुलगुरु

परीक्षेपासून वंचित विद्यार्थ्यांची नोव्हेंबरमध्ये परीक्षा : कुलगुरु

एकमत ऑनलाईन

नांदेड : स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या उन्हाळी २०२० पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षा १५ ऑक्टोबर पासून सुरु झालेल्या आहेत. पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या अंतिम सत्राच्या परीक्षा या ३१ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होणार आहेत. या दरम्यान ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षेच्या तांत्रिक अडचणीमुळे जर काही विद्यार्थी परीक्षा देण्यापासून वंचित राहिले असतील तर अशा विद्यार्थ्यांची अतिरिक्त परीक्षा नोव्हेंबरमध्ये घेण्यात येईल. अशी सूचना स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी आज दि. २३ ऑक्टोबर रोजी केली आहे.

विद्यापीठाने उन्हाळी २०२० नवीन परीक्षा पद्धती व नवीन तंत्रज्ञान आत्मसात केल्यामुळे परीक्षेच्या सुरुवातीला परीक्षेदरम्यान काही तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. पण आता परीक्षा सुरळीतपणे चालू आहेत. विद्यापीठाने निर्धारित केलेल्या एकूण ११४ परीक्षा केंद्रावर परीक्षा चालू आहेत. ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या तांत्रिक अडचणी सोडवून समुपदेशन करण्यासाठी महाविद्यालयनिहाय आय.टी. को-ऑडीर्नेटर नेमण्यात आलेले आहेत. एकूण ५४८ आय.टी. को-ऑडीर्नेटर ऑनलाईन परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करीत आहेत. या पदवी, पदव्युत्तर व व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेसाठी एकूण जवळपास ५० हजार विद्यार्थी परीक्षा देत आहेत. यापैकी ५० टक्के विद्यार्थी ऑनलाईन व उर्वरित ५० टक्के विद्यार्थी ऑफलाईन परीक्षा देत आहेत.

काही तांत्रिक अडचणीमुळे दि. १६ ऑक्टोबर रोजीचा रद्द झालेले पेपर दि. १७ ऑक्टोबर रोजी घेण्यात आले. आणि १७ ऑक्टोबर रोजीचा रद्द करण्यात आलेला पेपर दि. २८ ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. या परीक्षेदरम्यान पदवीमध्ये पदवी, पदव्युत्तर व व्यवसायिक अभ्यासक्रमाच्या परीक्षेमध्ये बि.फॉर्म., बि.लिब., बि.ए., बि.बि.ए, बि.एस्सी., बि.कॉम., बि.एड., बि.एफ.ए, बि.जे., बि.पी.एड., बि.एस्सी., बि.एस.डब्लू., बि. व्होक., इंजिनीअरिंग., लॉ., एम.लिब., एम.ए., एम.सि.ए, एम.एस्सी., एम.बि.ए., एम.कॉम., एम.एड., एम.जे., एम.पीएड., एम.एस.डब्लू., पी.जी.डी.डी.एम. इत्यादी अभ्यासक्रमाचा समावेश आहे.

ट्रक कारच्या अपघातात नऊ जखमी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,436FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या