23.8 C
Latur
Saturday, September 25, 2021
Homeनांदेडशिवणी, अप्पाराव पेठ परिसरात अतिवृष्टी

शिवणी, अप्पाराव पेठ परिसरात अतिवृष्टी

एकमत ऑनलाईन

शिवणी (प्रकाश कार्लेवाड) : किनवट तालुक्यातील शिवणी मंडळामध्ये मोठ्याप्रमाणात पाऊस झाला असुन अतिवृष्टी झाली आहे या मंडळात नदीला नाल्यांना पुर आल्यामुळे खरिप हंगामातील पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असुन शेतक-्यांचे पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. आमदार भिमराव केराम यांनी दि.१३ सप्टेंबर रोजी शिवणी मंडळात अनेक गावांना भेटी देऊन नुकसानीची पाहणी केली व तालुका प्रशासनाला पंचनामे करून तात्काक अहवाल सादर करण्याच्या सुचना दिल्या आहेत.तर या वेळी शिवणी येथे मागील विज पडून व पुरात वाहून गेलेल्या परिवाला भेटून सांत्वन केले.

किनवट तालुक्यातील शिवणी परिसरील अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड प्रमानात नुकसान झाले असुन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी आमदार भिमराव केराम यांनी आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी पाहणी केली . यावेळी नायब तहसीलदार शेख.रफीक.ता. कृषी आधिकारी बी.बी.मुंडे ,शिवणीच्या सरपंच लक्ष्मीबाई डुडुळे,जि.प.सदस्य तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सूर्यकांत आरंडकर, किनवट भाजपा तालुकाध्यक्ष संदिप केद्रे , भाजपा जिल्हा सचिव काशिनाथ शिन्दे, भाजपा तालुका सरचिटणीस बालाजी आलेवार, भाजपा अनुसुचित जमाती प्रदेश सचिव ,गोविंद अंकुरवाड सभापती प्रतिनिधी दत्ता आडे ,माजी सभापती प्रतिनिधी नारायण राठोड,उपसभापती कपिल करेवाड , युवा मोर्चा ता.उपाध्यक्ष शेख.लतीफ.सायन्ना बोंदरवाड, तुकाराम बेनगीर ,श्रीरंग पवार, गणपत राठोड,कपिल बंकलवाड प.स.सदस्य माधव डोखळे, रमेश बोड्डेवार,साबळे थारा, विवेक केद्रे,सागर पिसारिवार,आदि उपस्थित होते.

किनवट तालुक्यातील शिवणी परिसरात दि ६ व ७ सप्टेंबर रोजी अतिवृष्टीत व ढगफुटीसदृश्य होऊन या परिसरातील शेतक-्यांचे हाताला आलेले सोयाबीन, कापूस, तूर, धानपिक, या खरिप हंगामातील पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे तसेच नदीला नाल्याला मोठ्याप्रमाणात पुर येऊन पुराचे पाणी शेतात जाऊन उभे पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही शेतक-यांच्या शेतात नाला फुटून शेतातुन नाला पडला आहे या अनुषंगाने शिवणी परिसरातील शिवणी ,दयालधानोरा, गोडजेवली,अप्पारावपेठ , मलकजाम, कंचली,अंदबोरी , चिखली ,गोंडेमहागाव ,तोटंबा गावच्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी आमदार भिमराव केराम यांनी नुकसान झालेल्या पिकांची पाहणी केली.

आमदार भीमराव केराम यांनी कृषीआधिकारी, मंडळ आधिकारी ,तलाठी, कृषी सहायक यांना या नुकसानग्रस्त पिकाचे पंचनामे सरसकट करण्याचे सूचना दिले तसेच शासनाच्या वतिने शेतकरी बांधवाना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले यावेळी कृषी मंडळ अधिकारी ए.एम.येलपडवार, कृषी पर्यवेक्षक एस.पी.जाधव, जि.जि.डवरे, तलाठी सुभाष आडे ,विश्वास फड,अविनाश करंदीकर,कृषीसहायक दांडेगावकर, जाधव ,पांडे , ग्रा.पं सदस्य संग्राम बिरकुले ,शंकर भिसे ,यादव आमले,संतोष जाधव मा.ग्रा.प सदस्य,गणेश पाटील, किशन वानोळे, संतोष दत्ता जाधव, बालगंगाराम भुशिवाड, हनमंतु भुशिवाड, नरेश कौड, माधव नारदकर, विठ्ठल नारदकर,राजेन्ना बसीनवाड, करण पालोलु,दिंगाबर बोंदरवाड, गणेश शिलारवाड, नरेश बंडेवार, श्रीनिवास पंतनगीर,आदि उपस्थित होते.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या