22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeनांदेडअतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांचे भाव कडाडले

अतिवृष्टीमुळे भाजीपाल्यांचे भाव कडाडले

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : येथील बाजारपेठेत भाजीपाल्यांचे भाव अतिशय कडाडले असून, त्यामुळे उत्पादक शेतकरी समाधानी दिसत असला तरी सर्वसामान्यांचे मात्र आर्थिक बजेट कोलमडले आहे. आणखी काहि दिवस हे भाजीपाल्यांचे दर कायम राहणार असल्याने सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. मागील दीड वर्षापासुन कोरोनाने देशात थैमान घातले. अनेकांचे या कोरोना दरम्यान रोजगार गेले. तर या काळात शेतकरी हि देशोधडीला लागला.

मात्र मागील काही महीन्यापासुन कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असुन, हळुहळु सर्व कामकाज सुरळीत होत आहे. सध्या बाजारपेठा सुरू झाल्याअसुन आठवडी बाजारहि सरळीत भरत आहेत. सध्या धर्माबाद बाजारपेठेत गेल्या दोन दिवसापासुन कांदा ४० ते ५० रुपये प्रति किलो, लसूण शंभर ते १६० रुपये प्रति किलो, अद्रक दीडशे रुपये किलो, कोथिंबीर ३० रुपये पन्नास ग्राम, आलू ५० रुपये किलो, हिरवी मिरची ८० ते १०० रुपये प्रति किलो, फुल गोबी, पान गोबी, वांगी, दोडके, भेंडी, गवारीच्या शेंगा, चवळीच्या शेंगा, दोडका, तोंडाळे, आदी सर्व फळभाज्या आणि शेंगभाज्या जवळपास शंभर रुपये प्रतिकिलो विकल्या जात असून पालक, शेपू, चुका, म्हाटची भाजी, घोळाची भाजी, चमकुरा, आदी सर्व पालेभाज्याही शंभरी पार प्रमाणे घेतल्या जात आहेत.

दररोजच्या जेवणात आवश्यक असलेले टमाटे शंभरीच्या जवळ विकल्या जात असून सुरकंद, चमकुरा गड्डे पण प्रतिकिलो शंभर प्रमाणे विकत आहे. आठवड्याभरापासुन बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक मंदावल्याने या दरात मोठी वाढ होत आहे. मालाची आवक कमी असल्साने दोन दिवसापासुन अनेक भाज्यांनी शंभरी गाठली आहे. त्यामुळे सर्व सामान्य ग्राहकांचे बजेट कोलमडले असुन, भाजीपाला हा त्यांच्या आवाक्याबाहेर जावुन बसला आहे. मात्र गत आठवडाभरापासुन भाजीपाला आणि फळभाज्या यांना चांगला भाव मिळत असल्याने उत्पादक शेतकरी आणि विक्रते समाधान व्यक्त करत आहेत.

धर्माबाद बाजार पेठेत फळांचेही भाव गगनाला भिडले आहेत. सद्यस्थितीत दररोज बाजारात आकर्षक असे सिताफळ येत असून ते शंभर रुपयाला चार नग याप्रमाणे विक्री होत आहे. तसेच केळी ४० ते ५० रुपये प्रति डझन, सफरचंद एकशे वीस ते दोनशे रुपये प्रति किलो, ड्रॅगन फ्रुट १०० रुपये प्रति नग, चिकू शंभर रुपये प्रति किलो, डाळिंब शंभर रुपये प्रति किलो, अशा प्रमाणे विकत असून फळभाज्या पालेभाज्या चिकन मटण अंडी मासळी त्याच बरोबर फळेही महागल्यामुळे सर्वसामान्यांचे मात्र कंबरडे मोडले आहे.

पालेभाजी व फळभाजी प्रमाणेच चिकन व मटन आणि अंड्याचे भावही मोठ्या प्रमाणात वधारले आहेत. बकरा मटण ६०० रुपये प्रति किलोवर स्थिर असले तरी ब्रॉयलर चिकन मात्र १८० ते २०० रुपये प्रति किलो विकत आहे. अंडा प्रति नग सात रुपये प्रमाणे विकत असून मासळी ही आपल्या विविध जाती व गुणधर्मानुसार दोनशे रुपये ते चारशे रुपये प्रति किलोप्रमाणे विकल्या जात आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या