20.8 C
Latur
Friday, January 22, 2021
Home नांदेड कोव्हिड १९ अंतर्गतच्या कामातून शिक्षकांना वगळावे -अखिल महाराष्ट्र प्रा. शिक्षक संघटनेची ...

कोव्हिड १९ अंतर्गतच्या कामातून शिक्षकांना वगळावे -अखिल महाराष्ट्र प्रा. शिक्षक संघटनेची मागणी

एकमत ऑनलाईन

लोहा (प्रतीनीधी) : कोव्हिड १९ अंतर्गत शिक्षकांना कुटुंब सर्वेक्षण, कोरोना तपासणी आदी कामे बी. एल.ओ. चे काम करणाऱ्या व अन्य बहुतांश शिक्षकांना लावण्यात आलेल्या या कोरोनाच्या कामातून वगळण्याची मागणी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघटनेने निवेदनाद्वरे जिल्हाधिकारी नांदेड यांचेकडे निवासी उपजिल्हाधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून केली आहे.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक पाटील मारतळेकर, सरचिटणीस प्रल्हाद राठोड व संजीव मानकरी यांची उपस्थिती होती. या निवेदनात लक्ष वेधतना म्हटले आहे की, सदरील काम करणाऱ्या शिक्षकांना मास्क, हॅन्डग्लोज वा साधे सानेटायझर सुद्धा पुरविण्यात येत नाही. यामुळे कोरोना संसर्गाच्या दडपणाखाली शिक्षकवर्ग सदरील काम करत असून सोबत शाळा बंद शिक्षण चालू उपक्रमांतर्गत विद्यार्थ्याचा अभ्यासही शिक्षकांना पहायचा आहेच यामुळे कोरोना संसर्गाचा धोका वाढन्याची शक्यता नाकारता येत नाही.

महत्त्वाची बाब म्हणजे माझे कुटुंब माझी जबाबदारी या राज्य शासनाच्या मोहिमेच्या आदेशात शिक्षकांना या कामातून वगळण्यात आले असतानाही सदरील काम शिक्षकांना का लावण्यात आली आहेत ? असा प्रश्न अखिल शिक्षक संघटनेने उपस्थित केला आहे. यासाठी शासनाने दखल घेऊन त्वरित या कामातून शिक्षकांना मुक्त करावे असे मागणी शिक्षकांच्या माध्यमातून होत आहे.

पांडुरंग कारखान्याच्या चेअरमनपदी प्रशांत परिचारक यांची निवड

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,415FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या