22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeक्राइमअजगर मारून फोटो व्हायरल करणे पडले महागात : ७ आरोपींना अटक

अजगर मारून फोटो व्हायरल करणे पडले महागात : ७ आरोपींना अटक

एकमत ऑनलाईन

नांदेड: वन्य जीव असलेल्या एका अजगराला मारून त्याचे फोटो व्हायरल करणे पाटणूर येथील काही जणांना महागात पडले आहे़वन विभागाने या सात आरोपींना अटक करून न्यायालयात हजर केले आहे.

याबाबत माहिती अशी की, दि़ २० जुलै रोजी पाटणूर ग्रा . पं . या व्हाट्स अँप ग्रुपवर काही लोक वन्यप्राणी अजगरास मारून तो ओढत नेत असतानाचे फोटो व्हायरल झाले होते . त्या फोटो ची वनविभागाने स्वत: दखल घेऊन फोटोतील ६ आरोपींची व फोटो काढून ती व्हायरल करणारा आरोपी असे एकून ७ आरोपींची ओळख पटवून त्यांच्यावर वन्यजीव संरक्षन अधिनियमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला़यातील परमेश्वर दता कोकाटे, सटवाजी लक्ष्मण डुमणे,राजू अर्जुन गायकवाड,पंडित रेशमाजी येळणे,अप्पाराव पांडोजी कोकाटे ,रामा बळीराम पतंगे, नागोराव मारोती मिरासे सर्व रा . पाटणूर या आरोपींना अटक करण्यात आली.

सदरील आरोपींनी गुन्हा कबुल केल्याने त्यांना मुदखेड येथील न्यायालयात आरोपींना हजर करण्यात आले आहे. अजगर हा वन्य प्राणी वन्यजीव संरक्षक अधिनियम, १९७२ च्या अनुसूची १, भाग २ मधील प्राणी असून त्याची हत्या केल्यास 3 वर्ष पर्यंत तुरुंगवास किंवा २५ हजारापर्यंत दंड अशी शिक्षा होऊ शकतो.

सदरील कारवाई उपवनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा़ वनसंरक्षक डि.एस.पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी नांदेड श्रीधर कवळे, सचिन रामपुरे , वनपाल पी.ए. धोंडगे , बी.ए.हकदळे ,मानद वन्यजीव रक्षक अतीन्द्र कट्टी, वनरक्षक शिंदे , घुगे , काकडे , गव्हाणे , दासारवाड, वसीम, वाहनचालक जाधव यांनी केली.

Read More  वन विभागातील कामगारांचे हाल

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या