हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील पैनगंगा नदीला पूर परिस्थिती असल्याने परिसरातील वाळू माफियानी त्यांचा मोर्चा आता नाल्याकडे वळविला आहे दि.21 रोजी सरसम जवळील भोकर – हिमायतनगर महामार्गावर सरसम नाल्या च्या पुलावरून अवैध रेती तस्कर दिवसा ढवळ्या रोजनदारांच्या सहायाने अवैध वाळू नाल्यातून काढून वर राष्ट्रीय महामार्गा च्या कडेला ढीग मारत व ते वाळू रात्री बे रात्री ट्रॅक्टरच्या साह्याने घेऊन जात आहेत ह्याची माहिती सबंधित अधिकाऱ्यांना देऊन सुद्धा त्यांनी ह्या वाळू माफियांना पकडले का नाही व दुसऱ्या दिवशी तेथील वाळूचे ढिगारे मात्र गायब झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे
या सज्जाचे महसूल चे मंडळअधिकारी एम.वी. कंधारे व तलाठी एस.डी. दंतूलवाड यांच्या पथकांनी धाड टाकून जप्त केलेले वाळूचे ढीगारे गेले कुठे असा प्रश्न पर्यावरण प्रेमी नागरिक विचारीत आहेत ह्यामागे सबंधित अधिकाऱ्यांची मिलीभगत आहे की काय ?असा सवाल नागरिकांन मधून विचारला जात आहे
पैनगंगा नदीला पुर असल्याने वाळू तस्करानी नामी शकल लढवून तालुक्यातील सरसम,टेंभी,वडगाव, खैरगाव सह असंख्य नाल्यातून अवैध वाळूचा उपसा तेजीत सुरू केला आहे व तीच वाळू शहरातील असंख्य गरीब घरकुल धारकांना बेभाव दराने म्हणजे सात ते आठ हजार रुपयात टाकत आहेत ते वाळू माफिया रात्रन दिवस बेसुमार वाळू उपसा करून सुद्धा मोकाट का आहेत सद्या महसूल प्रशासनाची एकही कार्यवाही का होत नाही ह्या बाबी कडे स्थानिक महसूल चे वरिष्ठ अधिकारी यांनी लक्ष देऊन परिसरातील होणारी पर्यावरणाची हानी टाळावी अशी मागणी सुजाण नागरिकांन मधून होत आहे
सतत होणाऱ्या बंद मुळे व्यापारी व व्यवसाय धारकांचे कंबरडे मोडले, दुकानदारतून तीव्र नाराजी