29.2 C
Latur
Friday, May 7, 2021
Homeनांदेडअ‍ॅन्टीजन टेस्ट न करणे व्यापा-यांना भोवले

अ‍ॅन्टीजन टेस्ट न करणे व्यापा-यांना भोवले

एकमत ऑनलाईन

हदगाव: अत्यावश्यक सेवेतील व्यापा-यांना वारंवार सूचना करूनही अंतिजन टेस्ट न केल्यामुळे आणि प्रमाणपत्र दर्शनी भागात न लावल्यामुळे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दामोदर जाधव यांनी धडक कारवाई करित एका दिवसात नऊ व्यापा-यांकडून ६१ हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामुळे अत्यावश्यक सेवेतील व्यापा-यांचे धाबे दणाणले आहे.

सध्या नांदेड जिल्ह्यात कोरोना रोगाचा फैलाव झपट्याने वाढत असल्यामुळे तालुक्यात जनता कर्फ्यू लागू करण्या बाबत निर्णय घेण्यात आला तसेच दिनांक जिल्हाधिकारी नांदेड यांच्या प्राप्त आदेशानुसार शासनाने ज्या अत्यावश्यक सेवेतील दुकाने उघडी ठेवण्यास परवानगी दिली होती त्या दुकान मालकांनी आपली व आपल्या दुकानात काम करणा-या माणसाची कोरोना टेस्ट करून अहवाल दर्शनी भागात लावण्या बाबत सर्व व्यापारी भाजीपाला विक्रेते बेकरी व इतर अत्यावश्यक सेवेतील व्यापारी प्रतिष्ठाने यांना उपविभागीय अधिकारी यांनी बैठक घेऊन कोव्हिडची चाचणी करून घेण्यासाठी आवाहन केले होते.

परंतु शहरातील अनेक मेडिकल दुकान दार व इतर व्यापारी प्रतिष्ठान यांनी आपली चाचणी करून घेतली नसल्याचे तपासणी मधून निर्देश नास आले त्या मुळे तहसीलदार जीवराज डापकर यांच्या मार्गदर्शनाखाली नगर परिषदे चे मुख्याधिकारी दामोदर जाधव पोलीस निरीक्षक राख वैद्यकीय अधिकारी डॉ. ढगे न. प क़ार्यालय कर्मचा-यांना सोबत घेऊन शहरातील. अत्यावश्यक सेवेत असणा-या दुकान मालकांची करून तपासणी केली असता त्या मधील ब-याच दुकानदारांनी कोव्हिड बाबतची टेस्ट न केल्याचे निष्पन्न झाले अशा नऊ व्यापा‍-यांकडून ६१ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करून रक्कम वसूल करण्यात आली . गेल्या काही दिवसापासून शासनाच्या सुचनाकडे व्यापा-यांचे दुर्लक्ष होत आहे.तर काही ठिकाणी नियमांची पायमल्ली होत आहे. या कारवाईमुळे अत्यावश्यक सेवेतील व्यापा-यांचे धाबे दणाणले आहे.

हदगाव शहरात दिनांक २१ पासून ३० एप्रिल पर्यत जनता कर्फ्यू लागू केला असून या मध्ये फक्त रुग्णालय मेडिकल यांना उघडण्याची परवानगी असून पाणी प्लँट यांनी सकाळी ८ ते दुपारी १ या वेळेत पाणी वाटप करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी दामोदर जाधव यांनी केले आहे .

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या