हदगाव : अतिवृष्टीमुळे सोयाबीनसह इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून हातात आलेले पीक पावसामुळे वाहून गेले आहे. अर्थीक संकटात शेतकरी सापडले असून विमा कंपनीने सर्वे करूनही अद्याप विमा दिला नाही. याच्या निषेधार्थ पिकवीमा न दिल्यास १५ दिवसात कुटूंबियांसह आत्मदहन करू , असा इशारा हदगाव तालुक्यातील चिंचगव्हाण येथील शेतक-यांनी तहसीलदार व जिल्हधिका-यांना निवेदन देवून केला आहे.
ऑक्टोबर महिन्यात तालुक्यात परतीच्या पावसाने सततची हजेरी लावली असल्याने शेतकरी आर्थिक कचाट्यात सापडला होता मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकांचे अतोनात नुकसान झाले होते.तालुक्यातील चिंचगव्हाण परिसरात हातातोंडाशी आलेल्या सोयाबीनचा घास पावसाने हिरावून घेतला.शेतक-्यांना काहीतरी नुकसान भरपाई मिळावी या आशेने शेतक-्यांनी पिकांचा विमा काढला परंतु विमा कंपनीचा चाल ढकलपणा,व महसुल व कृषी विभागासह आमदार ,खासदारांच्या नाकर्तेपणामुळे हदगाव तालुक्यातील बहुतांश गावे पिक विम्याला मुकले आहेत. एकीकडे सरकार अतिवृष्ठीने पिकांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे अनुदान वाटप करीत आहे,तर दुसरीकडे विमा कंपनी शेतक-यांचे नुकसानच झाले नाही म्हणत पिक विमा देण्यास टाळाटाळ करीत आहे.
मग अतिवृष्टी झालीच नाही तर सरकारने अनुदान का दिले ? व झालीच तर विमा कंपनी शेतक-यांना विमा मंजुर का करीत नाही ? असा गंभीर प्रश्न शेतक-यांना पडला आहे. जर पंधरा दिवसाच्या आत शेतक-यांना विमा न मिळाल्यास आम्ही परिवारासह आत्मदहन करणार असल्याचे चिंचगव्हाण येथील शेतकरी बालाजी घडबळे, यांनी तहसिलदार हदगाव,जिल्हाधिकारी नांदेड ,इफको टोकीओ विमा कंपनी ,मुख्यमंत्री यांना तहसिलदारां मार्फत कळविले आहे
पक विमा कंपनीला तक्रार करुन पंचनाम्यासाठी अर्ज केला.कंपनीच्या हलगर्जी बाबत या अगोदर आत्मदहनाचा इशारा दिला होता तरीही,तालुका कृषी अधिका-यांनी विमा कंपनीला पत्र देऊनही कारवाही केली नाही त्यामुळे आलेल्या नैराशामुळे आम्ही पंधरा दिवसानंतर सह कुटुंब आत्मदहनाचा निर्णय घेतला आहे. असे शेतकरी वर्षा बालाजी घडबळे यांनी सांगीतले.