लोहा : तालुक्यातील काही खेडे डोंगराळ भागातील असुन या मध्ये वन्य प्राणी फिरत असतात सध्या तर राणडुकरांनी धुमाकुळ घातला असुन शेतक-यांना शेतीत जाणे व डोंगराळ भागात जनावरे घेऊन जाणे हे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे त्यांचा भाग म्हणुन किरोडा येथील शेतमजुर मुंजाजी लक्ष्मण टोकलवाड धंदा मजुरी वय वर्ष ७० हा गावातीलच शेतकरी माणीक माने, यांच्या शेतामध्ये कुपाटीचे झाडे तोडीत असताना त्याच मोठ्या जुगळीमध्ये रानडुकराचा कळप होता.
काटी तोडताना ते राणडुक्कर जुगळीतुन निघाले व सरळ शेतमजुरावर हल्ला चढवीला त्या हल्ल्यामध्ये शेतमजुर गंभीर जखमी होऊन तोंडाने धडक दिल्यामुळे डावा पायाला गंभीर दुखापत झाली असुन आरडाओरडा केल्यामुळे ते डुक्कर पळुन गेले जवळच असलेल्या त्यांच्या सोबत्याने पाणी पाजले व त्यांना तातकाळ नांदेड येथील आधार दवाखाण्यामध्ये उपचारासाठी दाखल केले व ते आता उपचार करुण आपल्या किरोडा गावी आले आहेत म्हणुन वरील शेतमजुरास वनविभागाने आर्थीक मदत करावी अशी मागणी शेतमजुर संघटणेचे अध्येक्ष सुरेश जोंधळे यांनी वरीष्ठाकडे केली आहे.