24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeनांदेडगळफास घेवून शेतक-याची आत्महत्या

गळफास घेवून शेतक-याची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

नांदेड: मागच्या दोन वर्षापासून जिल्ह्यात सतत नापिकी होवून शेती उत्पादनात घट झाली आहेÞ त्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला असून, याच विवंचनेतून एका ५० वर्षीय शेतक-याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी (दि. २९) किनवट तालूक्यातील बोथ शिवारात घडली.

उल्हास वामनराव सुरोसे (५०, रा. बोथ, ता. किनवट) असे या शेतक-याचे नाव आहे. सुरोसे हे गेल्या काही दिवसांपासून अर्थिक विवंचनेत होते. मागच्या दोन वर्षापासून शेतीच्या उत्पादनात झालेली घट व सततची नापिकी यामुळे ते चिंतेत होते. दरम्यान खरीप हंगामातील कामे अंतिम टप्प्यात असताना त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आपल्या भावाच्या शेतातील लाईटच्या टॉवरला दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. या प्रकरणी विजय सुभाष सुरोसे यांच्या फिर्यादीवरून मांडवी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलिस हवालदार कदम करीत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या