25 C
Latur
Monday, May 17, 2021
Homeनांदेडराजकीय नेत्यांना चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या

राजकीय नेत्यांना चिठ्ठी लिहून शेतक-याची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : शेणी येथील एका शेतक-यांने मुख्यमंत्री व पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांनी माज्या आत्महत्येची दखल घ्यावी अशी चिठ्ठी लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२१ नोव्हेंबर सकाळी नऊ वाजताच्या सुमारास शेणी येथे रोजी घडली. तालुक्यातील शेणी येथील सुरेश बाबाराव धुमाळ (वय ५२) यांच्यावर बँक ऑफ इंडियाचे जवळपास पाच लाख कर्ज व तर इतरही कर्ज होते.

तसेच यावर्षी अतिवृष्टीमुळे नापिकी झाली. तसेच सहा महिन्यांपूर्वी काही कारणाने त्यांची ऐंशी हजाराची म्हैसही दगावली होती. तिचा पंचनामा झाला पण कुठलीही मदत मिळाली नाही. कर्ज व दैनंदिन आर्थिक अडचण या विवंचनेत दि.२१ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार आणि आमदार यांच्या नावाचा उल्लेख करत माज्या आत्महत्येची दखल घ्यावी अशी मागणी करत शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, चार मुली, भाऊ असा मोठा परिवार आहे.त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून अधार्पूर पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

रेल्वे स्टेशनवर कोट्यवधींची रोकड व दागिने जप्त

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,496FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या