31.8 C
Latur
Saturday, April 1, 2023
Homeनांदेडनापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

नापिकीला कंटाळून शेतक-याची आत्महत्या

एकमत ऑनलाईन

मारतळा: प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील कापसी (बु) येथील कोरडवाहू अल्पभुधारक शेतक-याने सततची नापिकी आणि कर्जाचा वाढता डोंगर याला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. कापसी (बु) ता.लोहा येथील अल्पभूधारक शेतकरी बाबाराव मारोती वडवळे वय (५२) यांनी कर्जबाजारीपनाला व सततच्या नापिकीला कंटाळून आपल्या शेतात जाउन दि.१० फेब्रुवारी रोजी विषारी औषध प्राशन केले असता त्यांना पुढील उपचारासाठी विष्णुपुरी येथील कै. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आलेले होते.

उपचार सुरू असताना १२ फेब्रुवारी रोजी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पार्थिवावर कापसी (बु) येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मयत बाबाराव वडवळे यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, तीन मुली आहेत. दोन मूली विवाहित असून एक मुलगी अविवाहित आहे.

मुलीचे लग्न कसे करायचे, त्यातच कोरडवाहू शेती, निसर्गाचा असमतोल, सततची नापिकी, शेतीत केलेला खर्च पन निघणे जिकिरीचे झालेले आहे. तसेच त्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे पिककर्ज घेतलेले होते, त्याची परतफेड कशी करायची या आर्थिक विवंचनेतून त्यांनी आपली जीवन यात्रा संपवली.या घटनेमुळे वडवळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळलेला आहे व सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या