26.6 C
Latur
Monday, March 20, 2023
Homeनांदेडउमरा येथे विजेच्या धक्यांने शेतक-याचा मृत्यू

उमरा येथे विजेच्या धक्यांने शेतक-याचा मृत्यू

एकमत ऑनलाईन

मारतळा : प्रतिनिधी
लोहा तालुक्यातील उमरा येथे शेतात पिकांना पाणी देण्यासाठी विद्युत मोटार लावताना विजेचा धक्का लागून एका शेतक-्याचा मृत्यू झाल्याची दुदैर्वी घटना मंगळवारी घडली.

उमरा (ता.लोहा ) येथील शेतकरी विठ्ठल संभाजी मोरे ( वय- ४८) हे शेतातील पिकांस पाणी देण्यासाठी विद्युत मोटार लावताना विजेचा धक्का लागून ते कोसळले . तेव्हा शेजारच्या शेतक- यांनी तत्काळ धावाधाव करून त्यांना उपचारासाठी नांदेडला शासकीय रुग्णालयात हलविले.

मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले .त्यानंतर उत्तरीय तपासणी करून पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. व उमरा येथे रात्री त्यांचे पाथीर्वावर अंत्यसंस्कार करण्यात आले .त्यांच्या पश्चात आई, पत्नी ,एक मुलगा ,एक मुलगी, सून असा परिवार आहे. या शेतक-याच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या