ईस्लापुर : प्रतिनिधी
पहाटेच्या वेळी शेतात काम करतांना अचानक दोन अस्वलांनी केलेल्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झालाÞ हि घटना शनिवारी दि.२८ मे रोजी घडलीÞ यामुळे शेतक-यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहेÞ जलधारा गावातील शेतकरी देवराव हौसाजी खंदारे वय ४५ हे पेरणीचे दिवस जवळ आल्याने नेहमी प्रमाणे शनिवार दिÞ २८ मे रोजी पहाटेच्या वेळी शेतात काम करण्यासाठी गेले होतेÞ जंगलालगत शेत असल्याने जंगलातील तलावात बैलाला पाणी पाजवण्यासाठी गेले असता झुडूपात दबा धरुन बसलेल्या दोन अस्वलाने शेतकरी देवराव खंदारे यांच्यावर अचानक हल्ला केला.
खंदारे यांनी आरडाओरड केल्याने आजुबाजूला शेतात काम करणाया शेक-यांनी धाव घेतल्याने अस्वलानी पळ काढला. या हल्ल्यात शेतकयाच्या हाता,पायाला व कंबरेला गंभीर दुखापत झाली आहेÞ या शेतक-याला जलधारा येथून पुढील उपचारासाठी किनवट येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. अस्वलांच्या हल्ल्यामुळे जलधारा परिसरातील शेतक-यांत भितीचे वातावरण पसरले आहेÞ