21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेडराज्य सरकारमुळे शेतकरी पिक विम्यापासून वंचित

राज्य सरकारमुळे शेतकरी पिक विम्यापासून वंचित

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्य सरकारने खरीपाच्या हंगामात उंबरठा उत्पादन गोठविल्यामुळे शेतक-यांना पिक विमा मिळाला नाही. शेतक-यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्यामुळे अनेक अडचणींना तोंड ध्यावे लागत आहे. असा आरोपी भाजपाचे माजी मंत्री माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.
डॉ. अनिल बोंडे यांनी केला.

खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या संपर्क कार्यालय शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष व्यकंटराव गोरेगावकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. राजेश पवार , महानगर अध्यक्ष प्रविण साले, गणेश हंके, रंगनाथ सोळंके यांच्या सह इतरांची उपस्थित होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारने शेतक-यांची लुट करून विमा कंपन्या मालामाल केल्या आहेत. खरीप २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीसाच्या सरकारनी पिक विमा कंपन्या सोबत केलेल्या करारानुसार ८५ लाख शेतक-यांना ५७९५ कोटी रुपयाचा लाभ मिळाला होता. परंतु २०२० खरीप करिता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारनी विम्याचे निकष बदलविले. उंबरठा उत्पादन कमी केले आणि त्यामुळे महाराष्ट्रात खरीप २०२० मध्ये फक्त ७४३ कोटी रुपये पिक विमा नुकसानभरपाई वाटप आज पर्यंत शेतक-यांना करण्यात आली. विमा कंपन्यांना मात्र उद्धव ठाकरे सरकारच्या आशिवार्दाने ४२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा झाला,असा दावाही डॉ.अनिल बोंडे यांनी केला.

पंतप्रधान पिक विमा शेतक-यांच्या भल्याकरिता असला तरी महाराष्ट्रामध्ये विमा कंपन्या मालामाल करण्याचा उद्योग उद्धव ठाकरे सरकारनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या शासन काळामध्ये खरीप २०१९ मध्ये महाराष्ट्रात १२८ लाख शेतक-यांनी पिक विमा काढला होता. त्याकरिता शेतकरी हिस्सा, ६७८ कोटी रुपयाचा होता तर राज्य व केंद्र सरकारच्या हिस्यासह संपूर्ण विमा हप्ता पोटी ४७८८ कोटी रुपये भरण्यात आले होते. २०१९ खरीपाम्ध्ये ८५ लाख शेतक-यांना १५७९५ कोटी रुपयाचा पिक विमा प्राप्त झाला होता व त्याचे वाटप झाले होते.

खरीप २०२० करिता उद्धव ठाकरे सरकारनी निकषामध्ये बदल करून कमी उंबरठा उत्पादन तीन वर्षाकरिता गोठविले. २०२० खरिपामध्ये १०७ लाख शेतक-यांनी खरीप पिक विमा काढला. याकरिता शेतक-यांनी ५३० कोटी राज्य सरकारनी २४३८ कोटी, केंद्र सरकारनी २२४९ कोटी असा ५२१७ कोटी रुपयांचा विमा हप्ता विमा कंपन्यांना दिला. खरीप २०२० मध्ये अवकाळी पाउस, चक्रीवादळ अशी अनेक संकट आलीत. कापसाचे उत्पादन बोंडअळीमुळे कमी झाले. सोयाबीन हाती आल नाही. बियाण्यांचे प्लॉट सुद्धा खराब झाले. सर्व पिकांची विदारक परिस्थिती असतांना सुद्धा विमा कंपन्यांनी कृषी विभागा सोबत हात मिळवणी करून फक्त १५ लाख शेतक-यांना ९७४ कोटी रुपयांची नुकसानभरपाई निश्चित केली व त्यातील ७४३ कोटी रुपयांचे वाटप फक्त ११ लाख शेतक-यांना करण्यात आले. विमा कंपन्यांना उद्धव ठाकरे सरकारच्या आशिवार्दाने२ ४२३४ कोटी रुपयांचा निव्वळ नफा खरीप २०२० मध्ये मिळाला. आशा आरोप माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केला आहे.

हॉटेल पॅराडाईज मधील ८ नृत्यांगनासह २९ इसमाना अटक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या