हिमायतनगर:-(ता.प्रतिनिधी )तालुक्यातील भारतीय स्टेट बँक शाखा हिमायतनगर येथील अधिकारी यांच्या आडमुठे धोरणामुळे शेतकर्यांना वेळेवर पिक कर्ज मिळत नसल्याने शेतकर्यांतून बँक शाखेच्या मनमानी कारभारा बाबत तिव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
तालुक्यात सरसम बु. व स्थानिक हिमायतनगर येथे भारतीय स्टेट बँकेच्या दोन शाखा आहेत, तर ग्रामीण बँकेच्या कामारी व हिमायतनगर येथे शाखा आहेत. मधल्या काळात हैद्राबाद शाखेचे स्टेट बँकेत विलिनीकरण करण्यात आल्याने या शाखेवर पर्यायाने भार वाढला आहे. परंतु हिमायतनगर येथील शाखा व्यवस्थापनात अनियमितता आढळून येत असल्याने असंख्य शेतकर्यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे त्यांना त्यांचे काम करून घेण्यासाठी दलालांची गरज पडत आहे त्यामुळे ह्या बँकेत बँक म्यानिजर ची जागा रिक्त असल्याने इथे सद्यस्थितीत शेतकरी खरिपाच्या पेरणीतील पिकांच्या व्यवस्थापनासाठी आपले कागद पत्र घेऊन रागेत दिवसेंदिवस उभे राहून धडपडत करीत आहे त्यांना वेळेवर पिक कर्ज सुद्धा उपलब्ध होत नाही.
परंतु बँकेतील दलालांन कडून ते काम मात्र लवकर होत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे या बँक शाखेतून शेतकर्यांना वेळेवर पतपुरवठा सुद्धा होत नसल्याने कमालीची नाराजी शेतकर्यांतून व्यक्त केली जात आहे. याबाबीकडे संबंधित महाप्रबंधक यांनी तात्काळ लक्ष देऊन या शेतकर्यांना वेळेवर पिक कर्ज मिळवून देण्यासाठी उच्च स्तरावर उपाययोजना कराव्या. अशी मागणी शेतकर्यांतून पुढे येत आहे आणि बँक शाखेने कामात सुधारणा करूण कामाची गती नाही वाढविल्यास येत्या काळात शेतकरी आंदोलनाच्या पावीञ्यात उतरतील अशी शंका वर्तविण्यात येत आहे