28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडमुद्रांक खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी

मुद्रांक खरेदीसाठी शेतक-यांची गर्दी

एकमत ऑनलाईन

देगलूर: शहरामध्ये गेल्या काही दिवसापासून मुद्रांकाचा (बॉन्ड ) मोठ्या प्रमाणावर तुटवडा भासत आहे. शेतकºयांना पीक कर्ज काढण्यासाठी मुद्रांकाची आवशक्यकता आहे. मात्र हा मुद्रांक मिळत नसल्यामुळे शेतक-यांची मोठी अडचण होत आहे. मुद्रांक खरेदी साठी शेतक-यांना एका ठिकाणी गर्दी करावी लागत आहे. यामुळे कोरूना नियमाची ऐसी तैसी होत असल्याचे पहावयास मिळत आहे.

देगलूर शहरातील तहसील कार्यालय परिसरातील, दुय्यम निबंधक कार्यालय आणि न्यायालय परिसरात ही बॉण्ड विक्री केली जाते. मात्र दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्तलेखक व विक्रेत्यांनी बोंड विक्री बंद केल्याने शेतकºयांची मोठी अडचण झाली आहे शेतक-यांना जादा दराने खरेदी करावी लागत आहे याशिवाय करणामुळे फिजिकल डिस्टंसिंग चे पालन करणे आवश्यक आहे मात्र याठिकाणी कुठलेही फिजिकल डिस्टंसिंग पडताना दिसत नाही.

खरीप हंगामासाठी लागणारे पीक कर्ज वेळेवर मिळत नाही आणि त्याचे नियम व अटी जास्त असल्याने शेतकº्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे त्यात बोंड विक्री बंद झाल्याने एकाच ठिकाणी बोंड मिळत असल्याने शेतकरी गर्दी करत आहेत पोलीस आणि महसूल प्रशासनाने याकडे लक्ष देणे गरजेचे असून अगोदरच कोरोना रुग्णांची संख्या देगलूर तालुक्यात सव्वाशे च्या वर गेली आहे फिजिकल डिस्टेंस त्यांचे पालन होत नसल्याने आणखी रुग्ण संख्या वाढण्याची भीती वर्तवली जात आहे दरम्यान शेतक-यांना वाजवी दरात बोध मिळावा आणि फिजिकल डिस्टंसिंग चे पालन व्हावे अशी मागणी शेतक‍-यांतून जोर धरू लागली आहे.

Read More  केंद्रीय परिषदेचा वैद्यकीय अंतिम वर्षाच्या परीक्षेआधी इंटर्नशिपला नकार

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या