22.4 C
Latur
Thursday, September 29, 2022
Homeनांदेडशेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही

एकमत ऑनलाईन

नांदेड : राज्यात सर्वाधिक अतिवृष्टीमुळे नुकसान नांदेड जिल्ह्यात झाले असून, ज्या शेतक-यांच्या पिकांचे, शेतजमिनीचे, पशुधनाचे आणि विशेषत: घरांचे नुकसान झाले आहेÞ त्या नुकसानीचे पंचनामे अंतीम टप्प्यात आले असून, पाच दिवसात सर्व नुकसानीचे अहवाल शासनाकडे येतीलÞ जिल्ह्यातील एकही नुकसान बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित विभागाला दिले आहेत. ते नांदेड येथे बोलत होते.

राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी शनिवारी, रविवार अशा दोन दिवशीय नांदेड दौ-यावर आले होते. यावेळी त्यांनी रविवारी सकाळी कासारखेडा भागात नुकसानीची पाहणी करून, त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे कृषि आढावा बैठक घेतली. सदर बैठकीत त्यांनी मराठवाड्यातील सर्व जिल्हाधिका-यांशी व्हीडीओ कॉन्फरन्सींगच्या माध्यमातुन नुकसानीचा आढावा घेतला.

तर याबैठकीस माजी मुख्यमंत्री तथा आ. अशोकराव चव्हाण, खा. प्रतापराव पाटील चिखलीकर, आ. राम पाटील रातोळीकर, आ. अमरनाथ राजुरकर, आ. बालाजी कल्याणकर, आ. मोहन हंबर्डे, आ. राजेश पवार, आ. डॉ. तुषार राठोड, आ. मेघना बोर्डीकर-साकोरे, आ. तानाजी मुटकुळे, आ. रत्नाकर गुट्टे, प्रभारी जिल्हाधिकारी खूशालसिंह परदेशी, सीईओ वर्षा ठाकूर, आयूक्त डॉ. सुनील लहाने, विभागीय कृषि सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी रविशंकर चलवदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी या बैठकीला उपस्थित होते

कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी मराठवाड्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढाव घेत अन्य मुद्दावर चर्चा केली. यावेळी विज प्रश्नावर लोकप्रतिनिधीनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी महावितरणच्या अधिका-यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान झाले असताना महावितरणकडून शेतक-यांचे विज कनेक्शन कट केल्या जात आहे. हा प्रकार अतिशय गंभीर आहे. जिल्हाधिकारी यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. यापुढे प्रत्येक तालुक्यात ५० डीपी रिझर्व्ह ठेवण्याची सोय करण्यात यावी. कोणत्याही शेतक-यांचे विज कनेक्शन कट होणार नाही याची दक्षता घ्यावी. यापुढे एका शेतक-याचेही विज कनेक्शन कट झालेले चालणार नाहीत असे महावितरणच्या अधिका-यांना खडसावून सांगीतले. तसेच त्यांनी सर्व मराठवाड्यातील जिल्हाधिका-यांना तात्काळ पंचनामे पुर्ण करून झालेल्या नुकसानीचे अहवाल शासनाकडे लवकर सादर करण्याच्या सुचनाही दिल्या.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या