हिमायतनगर (प्रतिनिधी ) : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पीक कर्जाच्या अडचणी सह प्रधानमंत्री आवास योजना,नगर पंचायत अंतर्गत आत्म निर्भय फेरी वाल्यानाच्या कर्ज योजने संदर्भात आरोग्य सुविधे संदर्भात, लाईट संदर्भात ,उज्वला योजना, सह पाणी पुरवठा योजने संदर्भात आज दी 27 ऑगस्ट रोज मंगळवारी हिमायतनगर शहरातील पंचायत समिती सभागृहात हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी पहिल्यांदा बँक आधिकारी यांच्या सोबत कार्यकर्त्यांना घेऊन जनता दरबार भरविण्यात आला होते
या बैठकीच्या अध्यक्ष स्थानी हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, तर प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा लीड बँकेचे पाठक साहेब,अतिरिक्त एस डी एम डाप कर साहेब,तहसीलदार गायकवाड साहेब,नगराध्यक्ष कुणाल राठोड,पोलीस निरीक्षक कांबळे साहेब ,शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ ठाकरे हे होते
यावेळी खासदार हेमंत पाटील यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांशी पीक कर्जा संदर्भात चर्चा केली व त्यांच्या पीक कर्जाच्या अडचणी समजून घेऊन शहरातील भारतीय स्टेट बँकेच्या शाखा अधिकारी सह महाराष्ट्र ग्रामीण बँक,मध्यवर्ती बँक,नांदेड जिल्हा मध्यवर्ती च्या मॅनेजर शी रोख ठोक चर्चा करून बँकेत होत असलेल्या दलाला संदर्भात अनेकांनी या बैठकीत विषय उपस्थित केला व बँके ने वाटप केलेल्या कर्जाचा आढावा घेतला तेव्हा भारतीय स्टेट बँकेच्या कर्ज वाटपाचे उद्दिष्टे तीस कोटी रुपये होते त्यापैकी त्यांनी 12 ते 14 कोटी रुपये पीककर्ज वाटप केले असल्याचे सांगितले व महाराष्ट्र ग्रामीण बँकेने नऊ कोटी रुपयांचे पीक कर्ज वाटप केले,तर मध्यवर्ती बँकेने सहा कोटी ग्रामीण मध्यवर्ती बँकेने चार कोटी रुपये शेकऱ्याना पीक कर्ज वाटप केल्याचे सांगितले व अजुन डिसेंबर 2020 पर्यंत वरील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांना पीक कर्ज तात्काळ वाटप करण्यात यावे अशा बँक कर्मचाऱ्यांना सूचना सुद्धा देण्यात आल्या व यापुढे कोणत्याही बँकेत दलाल खपवून घेतला जाणार नाही असे त्यांनी यावेळी सांगितले
यावेळी उपस्थित शिवसेना तालुकाप्रमुख रामभाऊ ठाकरे हिमायतनगर शहराचे नगराध्यक्ष कुणाल राठोड नगरसेवक ज्ञानेश्वर शिंदे, जेष्ठ शिवसैनिक विठ्ठल ठाकरे, देवकते बापू, सावन डाके, किसान सेनेचे तालुका प्रमुख प्रकाश जाधव ,शिवसेना उपतालुका प्रमुख विलास वानखेडे, वाघी चे उपसरपंच नागोराव देवसरकर , प्रकाश जाधव लाईन तांडा,सरपंच विनोद अडे,मदनराव पाटील, संटीकप्पल वाड,साई देशं म वाड,श्रीराम माने, पाटील ,शिवसेना तालुका संघटक संजय काईतवाड,अनिल पाटील, देवकते बापू ,सत्यवर्तन ढोले, राजेश जाधव, युवासेना उपजिल्हाप्रमुख योगेश चिल्कावार, शहराध्यक्ष प्रकाश रामदीनवार ,युवा सेना तालुका प्रमुख विशाल राठोड, गजानन शिंदे, इद्रिस शेवाळकर , वसंत नारायण जाधव,कपिल हराले पाटील,अमोल धुमाळे, बालाजी आलेवाड, वाघी चे नागोराव पाटील, श्रीराम पाटील, संजय पाटील, संतोष माने गंगाधर हामंद ,राजीव व दतवाड ,अजय पाटील रवी पाटील ,विकास माने सिताराम माने ,शुभम कौशल्ये विलास पाटील ,सदानंद पाटील ,पुंजाराम गोपनपले सह सर्व कर्मचारी,पत्रकार व तालुक्यातील शेतकरी बांधव व शिवसैनिक यावेळी उपस्थित होते
पेशावरमध्ये भीषण बॉम्बस्फोट ; 8 जणांचा मृत्यू तर 70 जण जखमी