श्रीक्षेत्र माहूर : श्रीक्षेत्र माहूरच्या पोलीस ठाण्यात व्यस्त वेळेतून वेळ काढून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीधर जगताप यांनी अनेक झाडे लावून त्यांना दररोज पाणी टाकत झाडे जगविल्याने सपोनि श्रीधर जगताप यांचे वृक्ष प्रेम माहूर शहरासह तालुक्यात चचेर्चा विषय ठरला आहे.
शिस्तप्रिय असलेले सपोनि श्रीधर जगताप हे कायद्याच्या बाबतीत जसे कठोरपणे वागतात तसेच सामाजिक सलोखा राहावा यासाठी ते सतत प्रयत्नशील असतात अनेक कार्यक्रमात त्यांनी ग्लोबल वार्मिंग मुळे वातावरण होत असलेल्या बदलाबाबत मार्गदर्शनही केले असून युवकांना ते वृक्ष लागवडीसाठी प्रोत्साहित करीत असतात .