नांदेड : शहरातील गुरूद्वारा गेट क्र. एक परिसरात शुक्रवारी रात्री चार दुकानाला भिषण आग लागली. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ उठले होते.यामुळे नागरिकात काहीवेळ धावपळ उडाली. मात्र ही माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. या आगित लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्री १०:२० वाजता गुरूद्वारा गेट क्र. १ परिसरातील एका दुकानाला आग लागली.
लगत असलेल्या आणखी तीन दुकानाला आगिच्या डोंबाने वेढले. सदर माहिती महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी तात्काळ रवाना झाल्या. रात्री १०.२० वाजता आग विझविण्यास सुरूवात करण्यात आली. जवळपास एक तास प्रयत्न करून आग अटोक्यात आणली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. सदर आगित गुरूद्वारा गेट क्र. १ परिसरातील दुकान नं . ९ अमरदिपसिंघ तहेलसिंघ रागी, दुकान नंं.१० रोशनसिंघ मोहमनसिंग मान, दुकान नं.८ हरबजनसिंघ लालसिंघ व दुकान नं. ७ या दुकानाच्या मालकाचे नाव समजु शकले नाही. सदर चार दुकानाला भिषण आग लागुन लाखो रूपयांचा माल जळून खाक झाला आहे.
सदर दुकाने पुजेचे सामान, कपडे, खेळणे व इतर साहित्याचे व एक ऑफिसचे शटर होते. यात मोठी हाणी झाली असून सदर आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झाले नाही. या प्रकरणी दिलेल्या तक्रारीवरून वजिराबाद पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाने आग लवकरच आटोक्यात आणून पुढील होणारा अनर्थ टाळण्यास मदत केली.
या आगीत जिवीत हाणी झाली नसून साहित्य मोठ्या प्रमाणात जळून खाक झाले आहे. दरम्यान आगिची माहिती मिळताच परिसराती नागरिक घटनास्थळी मोठ्या प्रमाणात जमा झाले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमच्या जवानांनी मोठ्या शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. गुरूद्वारा परिसरात सर्वत्र धूर पसरला होता. यामुळे नागरिकांची काहीवेळ धावपळ उडाली.
रेल्वे स्टेशनवर कोट्यवधींची रोकड व दागिने जप्त