मालेगाव: कोविडचा प्रादुर्भाव पाहता ज्या ग्रामपंचायतिची मुदत संपलेल्या आहेत त्या ग्रामपंचायतवर प्रशासक नेमण्याचे अधिकार राज्य शासनाने पालकमंत्र्याला दिले आहेत. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील कॉगे्रसचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत़ मालेगावातील कार्यकर्ते पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्याकडे आपली बाजू मांडण्यासाठी चढाओढ करित आहेत.
मालेगावच्या राजकारणात नेहमीच सक्रिय राहिलेले परंतू थेट निवडणुकीत कधी ही सहभाग न घेतलेले अशोकराव चव्हाण यांचे विश्वासू बळवंत पाटील यांना संधी दिली पाहिजे असे त्यांचा समर्थकांचे म्हणणे आहे.तर मागील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडनुकित अशोकराव चव्हाण यांचे तळमळीने काम केलेले अनेक मनोज इंगोले यांना संधी मिळेल अशी चर्चा मालेगाव मध्ये आहे.
शिवाय माजी जिल्हा परिषद अध्यक्ष माणिकराव इंगोले यांचे मनोज इंगोले हे पुत्र असल्यामुळे पुन्हा एकदा मनोज इंगोले चा रूपाने अशोकराव चव्हाण माणिकरावांना राजकारणाचा मुख्य प्रवाहात आणतील का हा प्रश्न आहे. तर दुसरीकडे अनेक दिग्गज ही आपल्या पुत्रांची राजकीय एंन्ट्री या माध्यमातून करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यात जिल्हा बँकेचे संचालक केशवराव इंगोले हे आपला मुलगा पवन इंगोले यांची राजकीय एंन्ट्री करण्यासाठी इच्छुक आहेत.
पाणी वाटप संस्थेचा माध्यमातून उत्कृष्ट काम केलेले व अमिता चव्हाण यांचे विश्वासू ईश्वर पाटील यांच्या नावाची सुद्धा चर्चा सुरू आहे. मागील ग्रामपंचायत निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आलेले तरुण प्रमोद इंगोले, देवा इंगोले यांचे समर्थक ही कामाला लागले आहेत. परंतू अखेरचा निर्णय हा अशोकराव चव्हाण यांच्या वर अवलंबून आहे . वरील सर्व इच्छुकांना अशोकराव संधी देतात की सध्या कार्यरत असलेल्या सरपंचा यांचीच प्रशासक म्हणून नेमणूक करतात हे येत्या काळात कळेल.
Read More सोलापूर शहरात १५३ नवे कोरोनाबाधित