26.9 C
Latur
Sunday, July 3, 2022
Homeनांदेडअखेर सहस्रकुंड येथील वनजमिनीवरील अतिक्रमण काढले

अखेर सहस्रकुंड येथील वनजमिनीवरील अतिक्रमण काढले

एकमत ऑनलाईन

ईस्लापुर : सहस्रकुंड येथील वनजमिनीवरील अतिक्रमण अखेर शनिवार दि. ११ जून रोजी वनविभागाने फौजफाटयासह काढले आहे. यामुळे वनजमिनीवर अतिक्रमण केलेल्याचे धाबे चांगलेच दणाणले आहे.

सहस्रकुंड येथील गट नं. ५२ मध्ये काही बोगस धरणग्रस्ताने अतिक्रमण केले. तर काहीनी या वनजमिनीवर अतिक्रमण करुन प्लॉट विक्रीचा गोरखधंदा मांडल्याने येथील रहिवासी असलेले सतिश वाळकीकर यांनी एका वर्षाखाली वनविभागाकडे याबाबत कारवाई करण्याची लेखी निवेदनाव्दारे मागणी केली होती.

या मागणीच्या अनुषंगाने वनविभागाने वर्षभर कारवाई करण्यास टाळाटाळ केल्याने तक्रारकर्ते सतिश वाळकीकर यांनी अखेरचा पर्याय म्हणून मंत्रालयाच्या गेटसमोर आत्मदहन करण्याचा इशारा देऊन या अतिक्रमणा बाबत मुख्य सचिव बी.वेणुगोपाल रेड्डी यांच्याशी संपर्क साधून कारवाईची मागणी केल्याने मुख्य सचिवानी या बाबत गंभीर दखल घेतली. या अतिक्रमणाबाबत सविस्तर माहीती घेण्यासाठी नांदेडचे जिल्हाधिकारी डाँ विपीन इटनकर यांनी दि. ८ जुन बुधवार रोजी सहस्रकुंड येथे भेट देऊन वनविभागाच्या वतीने माहिती जाणून घेतली.

यातील १७ मुळ धरणग्रस्तांना गट नं. ६ मध्ये हलवण्यात येणार आहे.
अखेर या वनजमिनीवरील अतिक्रमणाबाबत वनविभागाचे उपवनसंरक्षकशव वाबळे, सहाय्यक वनसंरक्षक एस.एल.लखमावाड यांच्या आदेशाने दि. ११ जूना शनिवार रोजी वनविभागाने फौजफाटयासह जेसीबीने अतिक्रमण काढण्यास सुरवात केली आहे. ही कारवाई यशस्वी करण्यासाठी वनविभागाचे ईस्लापुरचे आर एफ.ओ.प्रकाश शिंदे, हिमायतनगरचे आर.एफ.ओ. बालाजी चव्हाण, बोधडीचे आर.एफ.ओ. श्रीकांत जाधव, अप्पारावपेठचे आर.एफ.ओ.रुषीकेश चव्हाण आणि फिरते पथकचे माधव केंद्रे यांनी पुर्ण केली.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या