24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडअखेर सात वर्षांचा राजकीय संघर्ष संपला

अखेर सात वर्षांचा राजकीय संघर्ष संपला

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यामधील कॉंगे्रसचे दोन दिग्गज असलेल्या दाजी भावजीमधील राजकीय संघर्ष घर वापसीमुळे संपला आहे.पक्ष बदलामुळे नाते संबधापासून दुर गेलेले दाजी तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी सकाळी माजी खासदार तथा भावजी भास्कराव खतगावकर यांच्या निवासस्थानी भेट देत दिसखुलास चर्चा केली.या नव्या समिकरणामुळे भाजपाला खिंडीत पकडण्यात आले अशी चर्चा होत आहे.

जवळपास सात वर्षांपुर्वी नांदेड जिल्ह्यात कॉंगे्रसचे दोन दिग्गज माजी खासदार भास्करराव पाख़तगावकर अर्थात भावजी व दाजी तथा पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांची ओळख होती.यामुळे नांदेड हा कॉगे्रसचा बालेकिल्ला होता.परंतू २०१४ साली लोकसभा निवडणुकीत कॉगे्रसचा दारूण परावभ झाला.राज्यात ही भाजपची सत्ता आली होती.यामुळे खतगावकर यांनी काही मंडळीच्या कारभाराला त्रस्त होत काँग्रेसला हात दाखवून भाजपात प्रवेश केला.यामुळे दोन नेत्यांत राजकीय संघर्ष सुरू झाला तर नाते संबधही दुरावले होते.

मात्र भाजपा खा.प्रताप पाटील चिखलीकर यांचा पक्षात जम वाढतात माजी खाख़तगावकर यांनी रविवारी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत आपण पुन्हा कॉगे्रस प्रवेश करणार असे जाहीर केले. या निर्णयाचे स्वागत करित पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी सोमवारी सकाळी थेट राजेंद्रनगर गाठत भावजी खतगावकर यांची भेट घेत सात वर्षापासून सुरू असलेला राजकीय संघर्ष समाप्त केला.सोबतच दोघांनीही एकमेकांचे स्वागत करून नाते संबधातील कटूता ही दुर केली.यावेळी दोन्ही नेत्यांत दिसखुलास चर्चा झाली.यामुळे काही दिवसात होऊ घातलेल्या देगलूर विधानसभा निवडणूकीस कलाटणी मिळेल अशी चर्चा होत आहे.

माजी खासदार भास्कराव खतगावकर यांनी परत कॉगे्रसमध्ये आणण्यासाठी मागील काही दिवसापासून व्यवरचना सुरू होती.तर भाजपमधील नाराजीचा फायदा घेत खतगावकरांना तयार करण्यात आले.भाजप सोडत असल्याचे सांगताच पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी खतगावकरांचे स्वागत केले होते.तेव्हाच सर्वांच्या भुवया उंचावल्या.अखेर नांदेडात दाखल होताच ना.चव्हाण यांनी सोमवारी सकाळी थेट खतगावकरांची भेट घेण्यास पुढाकार घेत मागच्या राजकीय संघर्षावर पडदा टाकला.

खतगावकरांनी आत्मपरिक्षण करावे
भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी माझ्यावर एकाधिकारशाहीचा आरोप केला आहे. मात्र हे अत्यंत चुकीचे असून एका ज्येष्ठ नेत्याने असे बोलू नये उलट त्यांनी भाजपात दाखल झाल्यावर पक्षासाठी इमानदारीने काम केले का याबाबत आत्मपरिक्षण करावे असे प्रतिउत्तर भाजप खा. प्रताप पाटील चिखलीकर यांनी खतगावकरांना दिले आहे.

कॉंग्रेसमधून भाजपात दाखल झालेले माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी रविवारी भाजप सदस्यत्वाचा राजीनामा देत खा. चिखलीकरांच्या एकाधिकारशाहीला कंटाळून कॉंग्रेसमध्ये प्रवेश करणार आहे असा आरोप केला होता. याच आरोपाला खा. चिखलीकर यांनी बिलोली येथे घेतलेल्या
पत्रकार परिषदेत सडेतोड उत्तर दिले आहे. खतगावकरांच्या बाबतीत बोलतांना ते म्हणाले की, ज्येष्ठ नेत्याने असे बोलण्यापेक्षा आत्मपरिक्षण
करावे.

आपण जया पक्षात राहतो तेथे इमानदारीने काम करणा-यालाच असे बोलण्याचा अधिकार आहे. मी चार पक्ष बदलले पण त्यांच्यासारखे एका पक्षात राहून दुस-या पक्षाचे काम करणारी औलाद नाही. जेथे जातो तेथे पक्षासाठी इमानदारीने काम करतो असे ते म्हणाले. तर खा. चिखलीकर यांनी देगलूर विधानसभेचे उमेदवार सुभाष साबणे यांना मी नाही तर भाजपच्या कोअर कमिटीने दिलेल्या अहवालानंतर पक्षाने तिकीट दिले आहे. मात्र पक्ष सोडतांना काहीतरी कारण सांगावे लागते तसेच खतगावकरांनी सांगितले असावे. भाजपात दाखल होताच खतगावकरांना पक्षाने राज्य उपाध्यक्ष केले याचा त्यांना विसर पडला आहे, असेही ते म्हणाले.

भाजपात एकाधिकारशाही नाही म्हणूनच देगलूर निवडणुकीसाठी १२ जणांचे उमेदवारीसाठी अर्ज आले होते.तर कॉगे्रसकडून एकच अर्ज आला.यावरून एकाधिकारशाही कुठे आहे हे पाहवे.या मतदार संघातील मतदार सुज्ञ आहे.बोलणा-या माणसाला आणि विकास कामे करणा-यास ते मतदान करतील. मुक्या आणि केवळ हातातले बाहूले म्हणून काम करण्यास विचार करतीलख़तगावकर यांनी भाजपात आल्यावर पक्षासाठी किती काम केले हे तपासून पाहवे असा सल्लाही खा.चिखलीकर यांनी दिला.यावेळी माजी मंत्री बबनराव लोणीकर,सुभाष साबणे यांच्यासह इतरांची उपस्थिती होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या