21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेड..अखेर हद्दवाढीचा प्रस्ताव सादर

..अखेर हद्दवाढीचा प्रस्ताव सादर

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या अनेक वर्षापासून पावडेवाडीसह इतर अनेक गावे महापालिका हद्दीत समाविष्ट करण्याचा निर्णय प्रलंबित होता. परंतु आज झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्वानुमते महापालिकेमार्फत मलनिस्सारण व पाणीपुरवठा करण्यात येणा-या सर्व गावांचा समावेश करण्याचा प्रस्ताव महानगरपालिकेच्या महासभेत घेण्यात आला असला तरी मुळगाव पावडेवाडीसह शेती वगळता सर्व गावांचा समावेश करण्यात आला आहे. यासोबतच आजच्या झालेल्या ऑफलाईन सर्वसाधारण सभेत पाण्याच्या विषयावर सभागृहात गदारोळ झाला. यावेळी मनपा आयुक्त डॉ. सुनिल लहाने यांनी तांत्रिक अडचण दूर करुन दिवाळीनंतर शहराला एकदिवसाआड पाणीपुरवठा होईल असे सभेत सांगितले.

नांदेड वाघाळा महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा कोरोनानंतर प्रथमच ऑफ लाईन बुधवारी घेण्यात आली. या सभेत विरोधीपक्ष नेते दिपक रावत, फह्यारुक अहेमद यांच्यासह अनेक सदस्यांनी पाणीपुरवठा वेळेवर होत नाही. काही ठिकाणी पाच ते सहा दिवस पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी पाईपलाईन तुटुन ड्रेनिजचे पाणी मिश्रीत होवून नळाला दुषीत पाणी येत आहे. अशा तक्रारी केल्या. तर अनेक सदस्यांनी पाणी प्रश्नावरून गदारोळ केला. प्रभाग १९ मध्ये कौठा भागात मलनिसारण पाईप लाईन फुटली असल्याची तक्रार नगरसेविका दिपाली मोरे यांनी केली. तर शहरातील अनेक ठिकाणी नाल्या बुजल्या असल्यामुळे दुषीत पाणी नालीमध्ये साचून राहत आहे. अशी तक्रार नगरसेवक पांपटवार यांनी केली. पाण्याच्या प्रश्नावर महापालिकेचे पाणीपुरवठा अभियंता अंधारे यांनी सविस्तर माहिती सभागृहात दिली. शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे पाण्याची क्षमता कमी असून लोकसंख्येच्या मानाने पाणी कमी पडत आहे. त्यामुळे सध्यातरी दररोज पाणीपुरवठा शक्य होणार नाही. असे पाणीपुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. या सर्व साधारण सभेस महापौर मोहिनी येवनकर, आयुक्त डॉ. सुनिल लहाने, अतिरिक्त आयुक्त मनोहरे, उपायुक्त अजितपाल संधु यांच्यासह महापालिकेतील अधिकारी, लोकप्रतिनिधी उपस्थित
होते.

शहराला पाणीपुरवठा करणारे जलकुंभ कोटीतिर्थ विष्णुपुरी व माळटेकडी या तिन ठिकाणी असून या ठिकाणची पाईप लाईन जुनी झाली आहे. त्याच बरोबर शहराची लोकसंख्या वाढली आहे. त्यामुळे सध्यातरी दररोज पाणीपुरवठा शक्य होणार नाही. असे आयुक्तांनी सांगीतले. दरम्यान सभे पुर्वी सर्व पदाधिकारी,सदस्यांची कोरोनाच्या पार्श्वभुमिवर थर्मल तपासणी करून सभागृहात प्रवेश देण्यात आला.

नदी की कहानी मत सुनाओ मै प्यासा हुं मुझे पाणी पिलाओ : फह्यारुख अहेमद
सभागृहामध्ये माजी सभापती फह्यारुख अहेमद यांनी शायरी करत ‘नदी की कहानी मत सुनाओ मै प्यासा हुं मुझे पाणी पिलाओ’ अशा शब्दात पाणीपुरवठा करण्याची मागणी सभागृहात केली. या मागणीला महापौर येवनकर यांनी वेळीच दखल घेवून पाण्याचा प्रश्न गंभीर असून तात्काळ उपाययोजना करण्यात यावी असा आदेश महापौरांनी सभागृहात पालिका प्रशासनाला दिले.

वाडीला नगर पंचायत करा: आ. कल्याणकर
महापालिकेत यापुर्वी समाविष्ट झालेल्या वाघाळा, सांगवी, तरोडा या भागात सुविधांची वाणवा आहे. असाच त्रास पुन्हा पावडेवाडीसह परिसरातील गावांना हदद वाढीमुळे होणार आहे. यामुळे पावडेवाडीस नगरपंचायतीचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी सेनेचे आ. बालाजी कल्याणकर यांनी केली.

आमदारांनी शब्द फिरवला : गाडीवाले
सेनेचे आ.बालाजी कल्याणकर यांनी मुंबई भेटीत झालेल्या चर्चेत पावडेवाडीसह इतर गावांचा महापालिका हद्दीत समावेश करावा.आपण सर्व जण विकासासाठी निधी आणू असे म्हणाले होते. परंतू आता आमदार आपला शब्द फिरवत आहेत.अशी प्रतिक्रिया मनपा सभागृह नेता विरेंद्रसिंह गाडीवाले यांनी दिली.

कालबाह्य संकल्पना?

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या