21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeनांदेड... अखेर नागरिक उतरले खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर

… अखेर नागरिक उतरले खड्डे बुजविण्यासाठी रस्त्यावर

एकमत ऑनलाईन

नांदेड : गेल्या एक ते दोन महिन्या पासून सतत दैनिक एकमतने खड्डेपुराण छापण्यास सुरुवात केल्यानंतर अनेक राजकीय, सामाजिक, नागरिकांनी यामध्ये पुढाकार घेतला असून प्रत्येक नागरिक आपले मत सोशल मीडियाद्वारे व्यक्त करत असतानाच यशवंतनगर येथील समाजसेवक दुर्गा प्रसाद जाजु यांनी तर चक्क यशवंतनगर भागातील खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेवून महापालिकेला तथा राजकीय मंडळीला लाजवल्यामुळे शहरात चर्चेचा विषय झाला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, उन्हाळा, हिवाळा असतानाही महापालिकेने खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेतलीच नाही. केवळ कागदावर खड्डे बुजविल्या असल्याचे पाहावयास मिळत आहे. या संदर्भात प्रसिद्धी माध्यमाने सातत्याने खड्डयाचे वृत्त प्रकाशीत करुन महापालिकेला कुंभकर्णीय झोपेतुन उठवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु महापालिकेने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज नांदेडकरांना भर पावसाळ्यात खड्डयांचा नाहाक त्रास सहन करावा लागत आहे.

हीच बाब लक्षात घेऊन यशवंत नगर येथील समाजसेवक दुर्गा प्रसाद जाजु यांनी स्वंयपुर्तीने रस्त्यावर उतरुण आपल्या प्रभागातील खड्डे बुजविण्याची मोहिम हाती घेताच आहाकार झाला. अन् जाजु यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होवू लागला. यामधील एक उदाहरण लक्षात घेता माणिक येवतीकर यांनी सोशल मीडियावर प्रखड प्रक्रियादेत असे म्हटले आहे की, डोळस माणसालाच कायदा मदत करत असतो. झोपी गेलेल्या जागा करत नाहीत.

हे त्रिकाल बाधीत सत्य वचन न्यायालयाला मान्य आहे, ब-याच न्याय निवाड्यात वरील म्हणीचा उपयोग केला जातो. असे सांगत पुढे ते म्हणाले की, यासाठी सर्वांनी एकत्रीत येवून महापालिकेच्या कुचकामी यंत्रणेला जानिव करुन देण्याची वेळ आहे. अशा अनेक यांच्यासारख्या प्रतिक्रिया सोशल मीडियातून व्यक्त होत आहेत. भाजपचे महानगर अध्यक्ष प्रविण साले यांच्या वक्तव्यास सोशल मीडियातून प्रचंड प्रतिसादानंतर व चर्चेला उदान आले.

 

रिझर्व्ह बँक ६००० कोटींची बॅड बँक बनवणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या