देगलूर : शहरासह तालुक्यात खासगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांची संख्या मोठ्या प्रमाणात असून या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून शालेय साहित्याच्या नावाखाली पालकांची आर्थिक लुट होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की देगलूर तालुका हा तेलंगाना व कर्नाटक सीमेवर असल्याने या बाबीचा फायदा घेऊन तालुक्यातील काही निवृत्त शिक्षक संस्था चालक आणि तेलंगाना व कर्नाटक राज्यातील काही लोकांनी मागील दहा ते पंधरा वर्षा पासून आपआपले इंग्रजी माध्यमाच्या शाळा उघडून ज्ञानदानाच्या नावाखाली गोरखधंदा करून कोट्यावधी धनसंपदा गोळा केली आहे.
या सर्व शाळेमध्ये शिक्षक कर्मचारी यांच्याकडे शैक्षणिक पात्रता नसल्याचेही निदर्शनात येत आहे गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे शाळा बंद असतांनाही या लोकांनी पालकांकडून पुढील वर्गाच्या प्रवेशासाठी संपूर्ण वर्षाची फी वसुलीकेली कोरोना मुळे लोकांचे पलकांचे आर्थिक गणित कोलमडल्याने आपल्या पाल्याच्या भवितव्याचा विचार करून उसनवारी करून संपूर्ण फी भरली आणि आता कुठे शाळा सुरु करण्याची शासनाने संपूर्ण तयारी केल्याने या संस्था चालकांनी गोरखधंदा करण्याचा नवीन उपाय शोधून काढला आहे.
सर्व शालेयसाहित्य त्यांच्याच शाळेतून घेण्यात यावे त्यात पाठ्यपुस्तक, वह्या, गणवेश, बूट, इतर साहित्याच्या नावाखाली पालकांची दामदुपट पद्धतीने आर्थिक लुट केली जात असल्याने पालकांमध्ये रोष व्यक्त करीत आहेत त्यातच भर म्हणून कि काय या सर्व बाबी कडे शिक्षण विभागाचे अधिकारी कर्मचारी मात्र साफ दुर्लक्ष करीत आहेत. या सर्व बाबीचा जिल्हा परिषदेच्या वरिष्ठ विभागा कडून चौकशी कण्यात यावी आणि अशी मागणी पालकांकडून करण्यात येत आहे.