नांदेड : शहरालगत असलेल्या सांगवी येथील एसटीपी प्लांटला भीषण आग लागुन लाखोचे नुकसान झाले आहे़ सदर घटना शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास घडली़ घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्नीशमन पथकाने घटनास्थळी धाव घेत शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळविले.
या घटनेत लाखो रूपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे़ नेमकी आग कोणत्या कारणामुळे लागली हे अद्याप स्पष्ट होवू शकले नाही़ या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सुरू असून, पोलिस अधिक तपास करीत आहेत.