नांदेड : विष्णुपुरी येथील कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयातील वॉटर फिल्टर प्लांटला अचानक आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. विष्णुपुरी येथील कै. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात येणारे रूग्ण व नातेवाईकांसाठी वॉटर फिल्टर प्लांट बसविण्यात आला आहे.
मंगळवारी दुपारी या प्लांटला अचानक आग लागल्याचे दिसून आले. त्यावेळी काही वेळ धावपळ उडाली. आगीची माहिती मिळताच मनपाचे अग्नीशमन अधिकारी केराजी दासरे जवानांसह दाखल झाले.यानंतर काही वेळात ही आग विझवण्यात आली. या आगीत एमबीबीआरच्या ७० बॅग जळून खाक झाल्या. यात अंदाजे ३० हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीचे कारण मात्र कळू शकले नाही.