कंधार : कंधार तालुक्यातील पानशेवडी व तळ्याच्या वाडी ढाकू तांडा गणा तांडा देवला तांडा परिसरातील खेमा तांडा, रामा तांडा,या सह जवळपास सात ते आठ तांडा परिसरातील २५०० हेक्टरच्या जवळ पास परीसर जळुन खाक झाली असून त्यामध्ये कडबा,गुळी ,मोठी झाडे , झुडपे संपुर्ण वनस्पती जळून खाक झाली या आगीत शेतक-्यांचे प्रचंड प्रमाणात अंदाजीत २५ हजार कडबा जळुन खाक झाला आहे. या आगीत पशु प्राण्याचा ही मोठ्या प्रमाणात मृत्यू झाला आहे.काही भागात शेतक-्यांचे आवजारे ही जळुन खाक झाले आहेत.
नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी आपले कृत्यव्य बजावत स्वाता गावक-याच्या मदतीने आग विजवण्यात यश आले असुन पानशेवडी परिसरातील आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न चालुच आहे. भाजपचे तालुकाध्यक्ष भगवान राठोड यांनी परिसरातील शेतक-्यांना घेऊन संबंधित अधिका-्यांना सूचना देऊन रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचा प्रयत्न केला प्रताप पाटील चिखलीकर यांना याबाबत सांगितले तर खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी अधिका-ाांशी संपर्क साधुन अग्नीशामक दलाच्या गाड्या पाठवण्यात आल्यामुळे मोठा अनर्थ टळाला आहे. तांड्यावरील लोकांनी सतर्क राहण्याचे आदेश नायब तहसिलदार विजय चव्हाण यांनी दिले आहेत.
आग लागलेलं परिसर पूर्ण जळून खाक झालेला आहे जंगली जनावर पशुपक्षी यांचे प्रचंड नुकसान झालेला आहे शेतक-्यांनी जनावरांसाठी ठेवलेला कडबा पुर्ण पणे जळुन गेला असल्याने शेतक-्यांना तात्काळ पंचनामे करून त्वरीत अर्थिक मदत देऊन जनावरासाठी छावण्या उभारण्याची मागणी माजी सैनिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष बालाजी चुकलवाड यांनी निवेदनाद्वारे कंधार तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्याकडे केली आहे.
१२ धरणांच्या बळकटीकरणासाठी ६२४ कोटी देणार