नांदेड : धनेगावजवळील चंदासिंग कॉर्नर येथील एका पेट्रोलपंपावरील इलेक्ट्रीक पॅनलला बुधवारी सायंकाळी शॉटसर्कीटने आग लागली़ एमआयडीसी भागातील अग्नीशमन दलाच्या पथकाने एका तासात आग आटोक्यात आणली़ यामुळे पुढील अनर्थ टळला़
धनेगाव येथील चंदासिंग कॉर्नर रस्त्यावरील मुंजाजी पेट्रोलपंपावरील इलेक्ट्रीक पॅनलला ८ जून रोजी सायंकाळी ६़३० च्या दरम्यान शॉर्टसर्कीट होवून आग लागली़ याची माहिती मॅनेंजर हनमंत मस्के यांनी एमआयडीसी येथील अग्नीशमन दलाला दिली़ येथील अधिकारी अतुल माळवतकर यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवून पथकासह अग्नीशमनच्या एका बंबाच्या मदतीने एका तासात आग अटोक्यात आणली़ यामुळे पुढील अनर्थ टळला आहे़ या कामगिरीत अग्नीशमन दलाचे अधिकारी अनिल देशमुख, संदीप सातुरकर, सतीष इंगळे, राहुल वाघमारे, मुकेश गिरी यांनी सहभाग घेतला़ याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आलेली आहे़