नांदेड : प्रतिनिधी
पोलिसांच्या अंगावर गाडी घालण्याचा प्रयत्न करून फरार होण्याच्या प्रयत्न करणा-या आरोपीच्या वाहनावर गोळीबार झाल्याचा प्रकार शुक्रवारीच्या रात्री नरसी ते बिलोली रस्त्यावर घडला होता. या प्रकरणी या चार आरोपींना पोलिसांनी जेरबंद करून न्यायालयात हजर केले असता, बिलोलीचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ठाणेदार यांनी चारही आरोपींना २३ फेबु्रवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
या प्रकरणातील आरोपी मोहम्मद ताहेर मोहम्मद एकबाल (२८) रा.मिल्लतनगर नांदेड, अब्दुल रौफ मोहम्मद उस्मान (३५) रा.चुनाभट्टी देगलूर नाका नांदेड, कय्युम खॉ आयुब खॉ (२७) रा.जि.बहराईज (उत्तरप्रदेश) ह.मु.मुुंब्रा मुंबई आणि फिरोज मुस्ताक अन्सारी (३९) रा.भिवंडी मुंबई यांना स्थागुशाच्या पथकानी पकडले होते. या चौघांनाही शनिवारी न्यायालयात हजर केले असता, या चौघांना न्यायालयाने २३ फेबु्रवारी पर्यंत पाच दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.