28.1 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडदरोड्यातील पाच आरोपी अटकेत

दरोड्यातील पाच आरोपी अटकेत

एकमत ऑनलाईन

नांदेड : आण्णाभाऊ साठे चौकात घडलेल्या दरोडा प्रकरणात शिवाजीनगर पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. दि.१ ऑगस्ट रोजीही शहरातील अण्णाभाऊ साठे चौकात एका वाटसरूस मारहाण करीत त्याच्याकडील एक मोबाईल व नगदी ५ हजार ५०० रूपयाचा मुद्देमाल जबरीने चोरून नेला होता. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणात आरोपी उदय उर्फ लडया भगवान हातांगळे (वय २४, रा. यात्री निवास) याच्यासह विशाल कैलास खिल्लारे (वय २१), सुरज रामकिशन घेणे (वय १९),अक्षय उर्फ भोप्या सुरेश कांबळे (वय २१) कितीर्पाल भिमराव आढाव (वय २०) सर्व रा. लक्ष्मीनगर नांदेड यांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या