21.1 C
Latur
Tuesday, March 9, 2021
Home नांदेड उमरीत ऊद्यापासुन पाच दिवसाचा लॉकडाऊन

उमरीत ऊद्यापासुन पाच दिवसाचा लॉकडाऊन

एकमत ऑनलाईन

उमरी : उमरी शहरात व तालुक्यातील कोरोना विषाणुचा वाढता पादुर्भाव लक्षात घेता उमरी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने कोव्हिड १९ कोरोना विषाणुचे संक्रमण रोखण्यासाठी आज दि ७ संप्टेबंर रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते,
यावेळी बैठकीचे अध्यक्ष म्हणुन तहसीलदार माधव बोथीकर होते.यावेळी त्यांनी जनता कर्फ्यू दरम्यान माज्या प्रशासनाला व्यापारी वर्गावर जबरदस्तीचे बंदचे निर्बध लादता येत नाहीत.

त्यासाठी सर्व व्यापा-यांनी आपापल्या असोशिएसनची चर्चा करून, एकमत घडवून शहर सुरक्षा दृष्टीक्षेपातुन आपल्या असोसिएशनच्या लेटरहेड वर आम्ही स्वखुशीने या जनता कर्फ्यूत सहभागी होत आहोत असे नमूद करून, एक प्रत तहसीलदार व एक प्रत मुख्याधिकारी नगरपरिषद यांना दयावे.बंदवर सहमत झाल्यात जमा आहे.सदरील बंद दि.०९ ते दि.१३ पर्यत बंद ठेवण्यात येईल सर्व व्यापारपेठा,किराणा, कृषी व्यावसायिक, आडत, भाजीपाला, हॉटेल, मद्य दुकाने, किरकोळ व्यावसायिक, हातगाडे बंद राहतील.बंदचे उल्न्घन केल्यास आर्थिक दंडापाठोपाठ पोलीस कारवाईस समोर जावे लागेल.

त्यासाठी सर्व नागरिकांनी आपल्याला पाच दिवस दरम्यान अत्यंत आवश्यक किराणा, भाजीपाला, दळण हे आज व उदया सायंकाळ पर्यत खरेदी करून घ्यावे असे मत प्रशासनाच्या वतीने मा तहसीलदार माधवराव बोथीकर यांनी व्यक्त केले यावेळी उमरी पंचायत समितीचे उपसभापती शिरीषभाऊ देशमुख गोरठेकर, पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामराजे कापरे, वैद्यकीय अधिकारी डॉ देवराये, सुभाष देसाई, राजेश देशमुख, पांडुरंग देशमुख, संजय कुलकर्णी,पारसमल दर्डा, प्रविण सारडा,अनिल दर्डा, गजानन श्रीरामवार,करुणाताई खंडेलोटे, साहेबराव पाटील शिंदे, बालाजी पाटील ढगे, शिवाजी मामा हेमके, सुरेश उमाटे, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष कैलास सोनकांबळे सह सर्व पत्रकार बांधव,व नगर परिषदेचे सर्व कर्मचारी व उमरी येथील प्रतिष्ठित नागरिक व व्यापारी वर्ग आदी उपस्थित होते.

नरेंद्र आर्य विद्यालय विद्यार्थी वस्तीगृहाची चौकशीचे आदेश काढणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,444FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या