24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeनांदेडशहरात कोव्हीड स्वॅब तपासणीकरीता पाच फिरती वाहने

शहरात कोव्हीड स्वॅब तपासणीकरीता पाच फिरती वाहने

एकमत ऑनलाईन

नांदेड : जगभरात कोव्हिड-१९ ने विळखा घातला आहे. भारतात महाराष्टÑाने अव्वल नंबर गाठला असून दिवसेंदिवस कोरोना महामारी आपले हात पाय पसरत आहे. मराठवाड्यात नांदेड दुसºया क्रमांकावर असल्याचे सांगितल्या जाते. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्या कल्पनेतून शहरात कोव्हिड स्वॅब तपासणीसाठी अद्यावत पाच फिरती वाहने निर्माण करण्यात आली आहेत.

नांदेड वाघाळा शहर महापालिका व जिल्हा प्रशासन यांच्या वतीने मनपा आयुक्तांनी आव्हान केले आहे की, नांदेड शहरामध्ये कोव्हिड-१९ रोगाचा जास्त फैलाव होत असल्यामुळे नांदेड शहरात कोव्हिड स्वॅब तपासणी करण्याकरिता प्रशासनाच्यावतीने वाहन उपलब्ध करण्यात आली असून सदर वाहनाद्वारे नांदेड शहरात ज्या भागामध्ये जास्त प्रमाणात कोव्हिड रुग्ण आढळून आले अशा भागात स्वॅबची तपासणी अ‍ँटीजन मोहिमेतंर्गत अ‍ॅन्टीजन किटद्वारे स्वॅब तपासणी करुन १५ मिनीटात तपासणी अहवाल देण्यात येणार आहे.

त्यामुळे ज्या भागात कोव्हिडचा प्रादुर्भाव झालेला आहे अशा भागातील नागरिकांवर ताबडतोब उपचार करता येतील. सद्या नांदेड शहरात कोव्हिडमुळे मृत्यूचे प्रमाण जास्त होत असल्यामुळे नागरिकांनी स्वत: काळजी घ्यावी व स्वॅब तपासणी करुन घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर व आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यावतीने करण्यात आले आहे.
शहरामध्ये स्वॅब घेण्यासाठी अद्यावत टाटासुमो वाहन फिरतीवर राहणार आहे. आजपर्यंत ५ हजार किट उपलब्ध आहेत. भविष्यात जवळपास ३0 हजार किट नांदेड शहरासाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी आयुक्त डॉ. सुनील लहाने यांनी दिली.

कोरोनामुळे डेंग्यू, मलेरियाकडे दुर्लक्ष
शहरात कोरोनाने विळखा घालू नये यासाठी जिल्हा प्रशासन व महापालिका युद्ध पातळीवर प्रयत्न करत आहेत. परंतु त्यासोबतच डेंग्यू , मलेरियासारखे आजार वाढत आहेत. प्रतिवर्षी पावसाळ्यात डेंग्यू, मलेरियासह साथ रोगाचा प्रसार होवू नये यासाठी महापालिका प्रयत्न करीत असते. परंतु यावर्षी मात्र साथ रोगाकडे पूर्णता दुर्लक्ष होत आहे. कोरोनाच्या भीतीने नागरिकही तपासणी करण्यास टाळाटाळ करीत आहत्ो. यासंदर्भात महापाका प्रशासनाने पुढाकार घेणे गरजेचे आहे.

Read More  बलात्काराची क्लिप मोबाईलवर पाठवत 2 लाख रूपयांची मागणी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या