37.6 C
Latur
Monday, April 19, 2021
Homeनांदेडएप्रिल महिन्यापासून नवीन पाच रेल्वेगाड्या सुरू होणार

एप्रिल महिन्यापासून नवीन पाच रेल्वेगाड्या सुरू होणार

एकमत ऑनलाईन

नांदेड : एप्रिल महिन्यात आणखी पाच नवीन रेल्वेगाड्या सुरू होत असून खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे . नांदेड – औरंगाबाद ,नांदेड – आदिलाबाद, नांदेड ते निजामुद्दीन, नांदेड सत्रागच्ची कलकत्ता आणि औरंगाबाद ते रेणुगुंठा तिरुपती या विशेष रेल्वे गाड्यांचा यात समावेश आहे.

लॉक डाऊन काळात बंद करण्यात आलेल्या रेल्वे हळूहळू पूर्वपदावर येत आहेत . मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना रेल्वेचा प्रवास अधिक सोयीस्कर व्हावा या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे सतत पाठपुरावा सुरू ठेवला आहे. खासदार चिखलीकर यांच्या पाठपुराव्यामुळे यापूर्वी अनेक रेल्वेगाड्या पूर्वत सुरू झाल्या. त्यामुळे नांदेडहुन दिल्ली, मुंबई ,पुणे, हैदराबाद या मार्गावर जाणा-या रेल्वे प्रवाशांना अनेक रेल्वे सेवेचा लाभ घेता येत आहे.

आणखी रेल्वेसेवा अधिक चांगल्या पद्धतीने मिळावी. रेल्वे प्रवाशांना अधिकाधिक रेल्वेची सेवा उपलब्ध व्हावी या अनुषंगाने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार नांदेड ते औरंगाबाद विशेष एक्स्प्रेस, नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस ,नांदेड ते निझामुद्दीन (दिल्ली) विशेष एक्स्प्रेस, नांदेड ते सत्रागच्ची (कलकत्ता) विशेष एक्स्प्रेस आणि औरंगाबाद ते रेनीगुंटा (तिरुपती) विशेष एक्स्प्रेस एप्रिल महिन्यात सुरु होणार आहेत. या सर्व गाड्या पूर्ण आरक्षित आहेत. रेल्वे प्रवाशांनी कोरोणाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने ठरवून दिलेल्या निदेर्शांचे तंतोतंत पालन करावे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोणापासून स्वत: सुरक्षित राहून इतर प्रवाशांना सुरक्षित ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहनही खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केले आहे.

नव्या गाड्यांचे वेळापत्रक
गाडी संख्या ०२७५३ नांदेड ते निझामुद्दीन (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दि.६ एप्रिलपासून नांदेड येथून दर मंगळवारी सकाळी ९ वाजता सुटेल. गाडी संख्या ०२७५४ निझामुद्दीन ते नांदेड (साप्ताहिक) विशेष एक्स्प्रेस दि.७ एप्रिल पासून निझामुद्दीन येथून दर बुधवारी रात्री २२.४० सुटेल. आदिलाबाद ते नांदेड विशेष एक्स्प्रेस दि. १ एप्रिल पासून आदिलाबाद येथून सकाळी ८ वाजता सुटेल.नांदेड ते आदिलाबाद विशेष एक्स्प्रेस दि.१ एप्रिलपासून नांदेड येथून दुपारी१५.०५ वाजता सुटेल. नांदेड ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस दि.२ एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ११.५० वाजता सुटेल.औरंगाबाद ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस ५ एप्रिलपासून नांदेड येथून रात्री १.०५ वाजता सुटेल. औरंगाबाद ते रेनीगुंटा विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस (दर शुक्रवारी) २ एप्रिलपासून औरंगाबाद येथून रात्री२०.५० वाजता सुटेल. रेनीगुंटा ते औरंगाबाद विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस रेनीगुंटा येथून रात्री २१.२५ वाजता सुटेल. नांदेड ते सत्रागच्ची विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस ५ एप्रिल पासून नांदेड येथून दुपारी१५.२५ वाजता सुटेल . सत्रागच्ची ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस कोलकत्ता येथून दुपारी १४.४५ वाजता सुटेल . नांदेड ते श्री गंगानगर विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस १ एप्रिलपासून नांदेड येथून सकाळी ६.५० वाजता सुटेल. गंगानगर ते नांदेड विशेष साप्ताहिक एक्स्प्रेस ३ एप्रिलपासून श्री गंगानगर येथून दुपारी १२.३० वाजता सुटेल .

खासगीकरणाचा अतिरेक देशाला घातक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,477FansLike
169FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या