भोकर : सालगडयानेच आपल्या मालकाच्या पाच वर्षीय बालीकेवर अत्याचार करून तिची निर्घून हत्या करून प्रेत नदीपात्रात फेकून दिले.सदर ह्रदयद्रावक घटना दिवशी बु.येथे दि .२० जानेवारी रोजी घडली होती.या घटनेने गावकरी संतप्त झाले असून गावात तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर आरोपीस गजाआड करण्यात आले असून न्यायालयाने त्यास दि.२७ पर्यंत पोलिस कोठडीत पाठविले आहे.
याबाबत माहिती की, भोकर तालुक्यातील दिवशी बु . येथील शेतकरी कुटुंबातील पाच वर्षीय चिमुकली दुपारी २ वाजल्यापासून घराबाहेर असल्याने तिचा शोध घेतला मात्र ती मिळाली नाही.यानंतर सालगडी बाबू उकंडू सांगेराव याने मुलीला पळवून नेले असावे असा संशय आल्याने त्यांनी ही माहिती भोकर पोलीसांना कळविली . दरम्यान सालगडी व मुलीचा शोध घेतांना तिचा मृतदेह शेजारील सुधा नदीपात्रात तरंगतांना आढळून आला . सदरील घटनेची माहिती मिळताच सपोनि शंकर डेडवाल, ज्ञानेश्वर सरोदे यांच्यासह अन्य पोलीस घटनास्थळी पोहचून पाहणी करतांना शेजारी झुडुपांमध्ये लपून बसलेला आरोपी सापडला. या घटनेमुळे संतापलेल्या गावक-यांनी घटनास्थळी मोठी गर्दी करीत आरोपीस आमच्या ताब्यात द्या अशी मागणी केली.
तेव्हा परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे लक्षात येताच घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी गोपाळ रांजनकर, पोलीस निरिक्षक विकास पाटील यांच्यासह पोलीस पोउनि अनिल कांबळे , पोउनि सुर्यकांत कांबळे, पो हेकॉं. संभाजी हनवते, प्रकाश श्रीरामे यांच्या पथकाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून संतप्त जमावास शांत करित आरोपीस ताब्यात घेतला. गावक-यांनी इन कॅमेरा शवविच्छेदनाची मागणी केल्याने सदरील पिडित मुलीचा मृतदेह उत्तरीय तपासणी करीता नांदेड येथील शासकिय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी फिर्यादीवरून भोकर पोलीसांत आरोपी बाबू उकंडू सांगेराव विरूध्द विविध कलमासह पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . या आरोपीस भोकर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दि .२७ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधिक्षक विजय कबाडे यांनी स्वत: घटनास्थळास प्रत्यक्ष भेट देऊन स्थानिक नागरीकांशी संवाद साधला.