23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeनांदेडहिंदू सणामध्ये वारंवार होत असलेला खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करा

हिंदू सणामध्ये वारंवार होत असलेला खंडित विद्युत पुरवठा सुरळीत करा

एकमत ऑनलाईन

हिमायतनगर : दिनांक ३१ सप्टेंबर पासून सर्वत्र हिंदू धर्माचे धार्मिक सण गणेश उत्सवा सह आगामी काळात गौरी गणपती व दुर्गादेवीची घटस्थापना होणार आहे त्या पार्श्भूमीवर शहरातील महावितरण कंपनीकडून मागील दोन दिवसापासून दररोज रात्रीला आठ ते नऊ दरम्यान महावितरणचा विद्युत पुरवठा खंडित होत आहे.

हे याची वरिष्ठांनी तात्काळ चौकशी करून तो विद्युत पुरवठा आगामी काळात सुरळीत करा अशा मागणीचे निवेदन दि. ३ सप्टेंबर रोजी सहाय्यक कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग कार्यालय हिमायतनगर यांना देण्यात आले अन्यथा सर्व गणेश भक्तांना घेऊन महावितरण विरोधात भाजपा युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष रामभाऊ सुर्यवंशी तीव्र आंदोलन करतील असा इशारा त्यांनी त्यावेळी बोलतांना दिला.

या बाबत सविस्तर वृत्त असे की सद्या महाराष्ट्र राज्यात धार्मिक हिंदू सणांपैकी गणेश उत्सव,मंगळा गौरीदेवी स्थापना,दुर्गाउत्सव असे सण लागोपाठ सुरू आहेत अशा पवित्र धार्मिक हिंदू सणांमध्ये दररोज सकाळी,संध्याकाळी नित्यनेमाने गणेश,मंगळागौरीच्यां मुर्तीसमोर आरती, भजन, कीर्तन प्रवचन, गायन वादन,वाचन सुरू असताना अचानक मागील दोन दिवसांपासून महावितरण कडून वीजपुरवठा खंडित होत आहे सध्या गणेशोत्सव असल्याने गावातील सर्व गणेश भक्तांचा आरतीचा वेळ सांयकाळी ७ ते १० वाजे पर्यंत असतो या वेळेत विद्युत पुरवठा खंडित होऊ नये, यासाठी सहाय्यक कार्यकारी अभियंता महावितरण उपविभाग कार्यालय हिमायतनगरला भारतीय जनता पार्टी कडून दि ३ सप्टेंबर रोजी एक लेखी निवेदन देण्यात आले.

अन्यथा भाजपा युवा मोर्चा तर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा रामभाऊ सूर्यवंशी यांनी दिला त्यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष आशिषभाऊ सकवान,भाजपा युवा मोर्चा तालुकाध्यक्ष रामभाऊ सूर्यवंशी,शहराध्यक्ष खंडू चव्हाण,युवा मोर्चा शहराध्यक्ष कल्याणसिंह ठाकुर,सेवा सो संचालक राम पाकलवाड, उपशहराध्यक्ष बालाजी ढोणे,सुभाष माने,अजय जाधव, लक्ष्मण चव्हाण, दुर्गेश मंडोजवार, वामनराव पाटील वडगावकर, अनिल माने,सचिन कोमावार, मिरजगावे, विनोद दुर्गेकर,ज्ञानेश्र्वर कोरडे यांच्यासह अनेक भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते..

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या