अर्धापूर : तब्बल एकेचाळीस वषार्पासून अखंडीतपणे गावातील ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करणारे एक गाव अधार्पूर तालुक्यात असून त्याचे नाव आमराबाद असे आहे. या गावाच्या सरपंच पदी श्यामराव यादोजी पाटील टेकाळे यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामीण भागातील खेडेगावात भावा – भावात भांडणे लावणारी, भाऊबंदकी मध्ये दोन परस्परविरोधी गट पाडणारी निवडणूक म्हणजे ग्रामपंचायत निवडणूक. या निवडणुकीवरून होणारे वाद – विवाद गावा – गावात पहायला मिळतात. मग ते गाव लहान असो किंवा मोठे. निवडणूकीत उमेदवारी किंवा पदावरून रस्सीखेच पाहायला मिळते. परंतु अधार्पूर तालुक्यातील आमराबाद हे गाव अशा गैरप्रकारापासून अलिप्त आहे. येथे तब्बल ४१ वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणूक ही बिनविरोध पार पडली आहे. त्यामुळे गावात बंधुभाव, एकता आणि सौख्य नांदत आहे. म्हणूनच गावातील सामाजिक आणि धार्मिक एकीमुळे गावासह शेत शिवारापर्यंत विकास पोहोचला आहे.
या भागातील शेतीसाठी स्वर्गीय डॉ. शंकरराव चव्हाण यांच्या पुढाकाराने उभारण्यात आलेल्या इसापूर धरणाचे पाणी मिळते. या प्रकल्पाने येथे जणू हरीतक्रांती घडवून आणली आहे. आमराबाद हे अगदी छोटेसे खेडेगाव असले तरी येथील शेती अतिशय सुपीक आहे. शिवाय सर्व शेतकरी अतिशय कष्टाळू असल्यामूळे आपल्या शेतात वेगवेगळे प्रयोग करून कोट्यावधी रुपयांचे उत्पादन काढतात. त्यामुळे येथील शेतकरी, शेतमजूर व कामगार सुखी जिवन जगत आहे. आमराबाद आणि परिसरात ऊस, केळी व हळदीचे मुख्य पीक घेतले जाते. येथील नागरिकांनी जशी शेती फुलवली तशी गावात एकी ठेवून कितीर्ही वाढविली आहे.
केवळ एक हजाराच्या जवळपास लोकसंख्या असलेल्या या गावातील गावक-्यांनी तब्बल ४१ वषार्पासून गावात निवडणुक न घेता एकाच व्यक्तीला बिनविरोध निवडून देऊन एक चांगला पायंडा पाडला आहे. ग्रामपंचायतीसह सेवा सहकारी संस्थेची निवडणूक सुध्दा बिनविरोध होते. नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत आणि सेवा सहकारी सोसायटीची निवडणूक बिनविरोध पार पाडून यंदाही ही परंपरा कायम ठेवली आहे. येथील ग्रामपंचायतच्या सरपंच पदी शामराव पाटील टेकाळे यांची सहाव्यांदा बिनविरोध निवड झाली आहे. तर सरस्वती गुणाजी मुकादम या महिलेला उपसरपंच पद देवून महिला जातीचा सन्मान करण्यात आला आहे.
आमराबाद या गावांत कोणत्याही प्रकारची गटबाजी नसल्यामूळे संपूर्ण गावातील रस्त्याच्या मजबुतीकरणासह शेत शिवाराचेही मजबुतीकरण करून डांबरीकरण, सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा किंवा पडीक जमीनीत तब्बल पाच हजारापेक्षाही जास्त झाडांची लागवड केली आहे. सदरील कामे करताना कामाच्या दजार्बाबत काळजी घेतली जाते. प्रसंगी स्वत:चे पैसेही खर्च सरपंच श्यामराव पाटील टेकाळे हे शासनाने दिलेल्या अंदाज पत्रकाप्रमाणे किंबहुना त्याहीपेक्षा मजबूत कामे करवून घेतात. मागील ३० वषार्पूर्वी त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेली कामे व रस्ते अजूनही मजबूत आहेत. तसेच परिसरातील शेत शिवारापर्यंत मजबूत रस्ते तयार झाल्यामुळे शेतक-्यांना शेतीमालाच्या वाहतुकीसाठी अत्याल्प खर्च येतो. त्यामुळे शेतक-्यांचे उत्पन्न वाढले आहे. तसेच गावातील ग्रामपंचायत इमारत, शाळा, पाणीपुरवठा, अंतर्गत रस्ते यासह विविध विकासकामे पूर्ण झाली असून यंदा ह्ल स्वच्छ गाव – सुंदर गाव ह्ल या स्पर्धेत सहभाग घेतला असल्याचे सरपंच श्यामराव पाटील टेकाळे यांनी सांगितले आहे.
आमराबाद हे छोटेशे टुमदार गाव आज आदर्श गावाच्या वाटेवर असून येथे आजपर्यत गावातील जे काही किरकोळ वाद असतील ते गावातच मिटवून पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद होणार नाही याची काळजी घेतली आहे. त्यामुळे गावात कायम शांतता असून सर्व जाती धमार्चे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. गावाच्या विकासासाठी मी सदैव तत्पर असून ज्यावेळी गावातील एकाही व्यक्तीकडून मला विरोध होईल त्याच दिवशी माझी सेवा मी सन्मानाने थांबवेल. असे नवनिर्वाचीत सरपंच श्यामराव पाटील टेकाळे यांनी सांगीतले.
दुस-या लाटेचे हाकारे, लॉकडाऊनचे इशारे !