20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeनांदेडमाजी मंत्री नसीम खान अपघातात जखमी

माजी मंत्री नसीम खान अपघातात जखमी

एकमत ऑनलाईन

नांदेड : भारत जोडो यात्रेत सहभागी होण्यासाठी नांदेडकडे निघालेले काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान यांच्या गाडीला बिलोली येथे टोल नाक्याजवळ अपघात झाला. सुदैवाने यात ते किरकोळ जखमी झाले. ही घटना काल शनिवारी सायंकाळी घडली.

कॉगे्रसचे नेते राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा उद्या दि. ७ रोजी सायंकाळी महाराष्ट्रात देगलूर येथे दाखल होत आहे. या यात्रेत सहभागी होण्यासाठी काँग्रेसचे माजी मंत्री आरिफ नसीम खान हैदराबाद येथुन आपल्या कारने नांदेडकडे निघाले होते. शनिवारी सायंकाळी बिलोली येथे टोल नाक्याजवळ समोरून येणा-या गाडीने नसीम खान यांच्या कारला धडक दिली. यात नसीम खान यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. बिलोलीमध्ये त्यांच्यावर प्रथमोचार करून नसीम खान दुस-या गाडीने नांदेडमध्ये दाखल झाले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या