24.7 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeनांदेडमाजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे निधन

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांचे निधन

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा भोकर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्रीनिवास ऊर्फ बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांची प्रकृती अचानक खालावली. त्यानंतर नांदेड येथील एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असताना बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने भोकर विधानसभा मतदारसंघ आणि नायगावमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी दुपारी २ च्या सुमारास गोरठा (ता. उमरी) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांची काल प्रकृती बिघडल्याने त्यांना नांदेड येथील खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने त्यांना हायपॉवर व्हेंटिलेटरवर ठेवून उपचार सुरू होते. उपचारादरम्यान बुधवारी रात्री उशिरा त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे भोकर मतदारसंघासह नायगाव, उमरी, धर्माबादमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, तीन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघाचे त्यांनी दोनवेळा प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे या मतदारसंघासह नायगाव, उमरी, धर्माबादमध्ये त्यांचा चांगलाच प्रभाव होता. तसेच कार्यकर्त्यांचे जाळेही होते. आजही त्यांची या भागात चांगलीच पकड होती. त्यामुळे भोकर तालुक्यासह नायगाव, उमरी, धर्माबाद तालुका एका मोठ्या नेतृत्वाला मुकला आहे. त्यांच्या जाण्याने या भागाचे मोठे नुकसान झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या