22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeनांदेडसेनेचे माजी आमदार, दोन जिल्हा प्रमुखांसह अनेकांवर गुन्हे दाखल

सेनेचे माजी आमदार, दोन जिल्हा प्रमुखांसह अनेकांवर गुन्हे दाखल

एकमत ऑनलाईन

नांदेड : बंडखोर नेते मंत्री एकनाथ शिंदे व आ. बालाजी कल्याणकर यांच्या विरोधात शिवसेनेकडून आंदोलन करण्यात आले होते. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात एका माजी आमदार, दोन जिल्हाप्रमुखासह अनेकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवसेनेचे बंडखोर नेते तथा मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात नांदेड उत्तरचे आ. ़ बालाजी कल्याणकर गेले आहेत. त्यामुळे बंडखोर आमदार बालाजी कल्याणकर यांच्या निषेधार्थ त्यांच्या कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला करत निषेध केला. तर दि़ २६ जून रोजी शासकीय विश्रामगृहासमोर मंत्री एकनाथ शिंदे व आ. कल्याणकर यांच्याविरुद्ध घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतिमा जाळण्यात आल्या होत्या.

पदाधिका-यांनी जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलिस अंमलदार राजेश राठोड यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे़यात माजी आमदार नागेश पाटील आष्टीकर, जिल्हाप्रमुख दत्ता पाटील कोकाटे, आनंद बोंढारकर, सहसंपर्कप्रमुख भुजंग पाटील, प्रकाश मारावार, जिल्हा समन्वयक धोंडू पाटील, अशोक उमरेकर, तालुकाप्रमुख जयवंत कदम, उपजिल्हाप्रमुख बबन बारसे, पप्पू जाधव, माजी विरोधी पक्षनेते बंडू खेडकर, शहरप्रमुख तुलजेश यादव, डॉ. निकिता चव्हाण, त् निकिता शहापूरवाड, गौतम जैन, संतोष कपाटे, नवज्योतसिंग गाडीवाले, युवासेनेचे व्यंकटेश मामीलवाड यांच्यासह सुनील शिंदे आणि इतर शिवसैनिकांवर कलम १३५ मुंबई पोलीस कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सावंत करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या