24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeनांदेडदरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद

दरोड्याच्या तयारीतील चौघे जेरबंद

एकमत ऑनलाईन

नांदेड: प्रतिनिधी
जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून, शस्त्राचा धाक दाखवून लुटमार, घरफोडी, दरोडा अशा घटनात वाढ झाली आहे. दरम्यान ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतही टापरे चौक भागातून स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना घातक शस्त्रासह अटक केली. त्यांच्याकडून स्थागुशा पथकाने जवळपास साडे तेरा लाख रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. यावेळी अंधाराचा फायदा घेत इतर चार आरोपी पळ काढण्यात यशस्वी झाले.

ंजिल्ह्यामध्ये वाढत्या गुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेता पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे यांनी गंभीर गुन्हात फरार असलेल्या आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्याच्या सुचना स्थागुशाला आदेशीत केले होते. त्यानुसार स्थागुशाचे पोनि द्वारकादास चिखलीकर यांनी त्याअनुषंगान वेगवेळी पथके तयार करुन गुन्हयातील आरोपीचा शोध घेणे चालु होते.

दरम्यान दि. २५ ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे नांदेड शहरात पेट्रोलींग करीत असताना, गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशिर माहीती मिळाली की, ग्रामीण पोलीस ठाणे हद्दीत टापरे चौकजवळ रस्त्यालगत झुडपाचे बाजुस काही संशयीत व्यक्ती थांबलेले असुन, त्यांचेकडे खंजर, तलवार व इतर हत्यारे आहेत. ते कुठेतरी दरोडा टाकण्यासाठी तयारीत आहेत. अशी खात्रीशिर माहीती मिळाल्याने स्थागुशचे पथकाने सदर ठिकाणी वेळ रात्री १०.४५ वाजेच्या सुमारास लातुर ते नागपुर जाणारे बायपास रोडवरील टापरे चौकजवळ येथे रोडलगत झुडपाचे बाजुस गेले असता, काहीजण संशयास्पद त्या ठिकाणी दबा धरुन बसलेले दिसुन आले. पोलीसांनी सापळा रचला असता पोलीसांना पाहुन दबा धरलेल्या संशयीतापैकी चारजण अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले. तर पोलीसांनी राजेंद्र ऊर्फ दादा छगन काळे (वय ४८), संजय ऊर्फ पिल्या ऊर्फ भैया पि. राजेंद्र ऊर्फ दादा काळे (वय २५), नितीन भारत डिकले (वय २८) तिघेही रा. मस्सा ता. कळंब जि. उस्मानाबाद व प्रदिप बाळासो चौधरी (वय २७ रा. उरळीकांचण, ता. हवेली जि. पुणे) या चौघांना अटक केली. तर त्यांच्याकडे सोबतचे पळुन गेलेल्या आरोपींची नावे विचारली असता त्यांनी रविंद्र बप्पा काळे, शंकर सुरेश काळे, अनिल रमेश शिंदे तिघेही रा. मस्सा ता. कळंब व अरुण बबन शिंदे रा. मोहा ता. कळंब अशा चौघांची नावे सांगीतली.

या कारवाई दरम्यान पकडलेल्याआरोपीताकडून खंजर, तलवार, हातोडी, सबल टॉमी, लोखंडी रॉड, दोर, मिरची पुड, मोबाईल हँडसेट व दोन चार चाकी वाहने असे एकुण १३ लाख ३३ हजार ७०० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. सदर आरोपी हे लातुर ते नागपुर जाणारे बायपास रोडवरुन जाणा-या- येणा-या लोकांना, वाहनांना आडवुन त्यांच्याजवळील पैसे, मोबाईल काढुन घेवुन लुटमार करण्याचे हेतूने थांबले असल्याचे त्यांनी कबूल केले. तसेच पोलीस ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल असलेला गुरनं. ५१७/२०२२ हा गुन्हा केला असल्याचे ही सांगीतले आहे. या प्रकरणी त्यांचेविरुध्द ग्रामीण पोलीस ठाण्यात गुरनं. ५२०/२०२२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद आरोपीतांकडुन आणखीन गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, विजय कबाडे, पोनि द्वारकादास चिखलीकर पोलीस निरीक्षक, यांचे मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे सपोनि पांडुरंग माने, घेवारे, पोउपनि डि.एन. काळे, पोहेकॉ सुरेश घुगे, मारोती तेलंग, पोना बालाजी तेलंग, विठ्ठल शेळके, पोकॉ तानाजी येळगे, मोतीराम पवार, बालाजी यादगीरवाड, चालक हेमंत बिचकेवार, शेख कलीम यांनी पार पाडली आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या