29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeनांदेडचार दरोडेखोर जेरबंद

चार दरोडेखोर जेरबंद

एकमत ऑनलाईन

नांदेड : प्रतिनिधी
ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीत मागच्या काही दिवसापासून लुटमारीच्या घटनात वाढ झाली असून, आठवडाभरात किमान दोन चार तरी जबरी लुटमारीच्या घटना घडतात. दरम्यान दि. ११ रोजी ग्रामीण ठाण्याच्या पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या चौघांना असदवन भागातून जेरबंद केले. त्यांच्याकडून घातक शस्त्रासह जवळपास दीड लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चौघाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता १६ मार्चपर्यंत न्यायालयाने त्यांना कोठडी सुनावली आहे.

ग्रामीण पोलिस ठाणे हद्दीतील ग्रामीण तंत्रनिकेतन कॉलेज ते असदवन वाघाळा जाणारे रोडच्या बाजुस थांबुन रस्त्याने येणारे-जाणारे प्रवाशावर लुटण्यांचे इराद्याने अंधारात ५ ते ६ दरोडेखोर दबा धरून थांबलेअसल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती ग्रामीण पोलीसांना मिळाली. सदर माहिती वरीष्ठांना देण्यात आली. त्यानंतर वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण ठाण्याचे पोनि अशोक घारेबांड व त्यांचे पथक तात्काळ ग्रामीण तंत्रनिकेतन कॉलेज ते असदवन वाघाळा जाणारे रस्त्याकडे रवाना झाले. यावेळी सदर रस्त्यावरील गुरूकुल इंग्लिश स्कुलच्या पाटीजवळ दि.११ मार्च रोजी रात्री १.५ वाजता नमुद काहीजण दरोड्याच्या इराद्याने दबा धरून बसले होते. पोलीसांनी सापळा रचुन त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला असता चाहूल लागताच त्या ठिकाणावरून सहा आरोपी अंधाराचा फायदा घेवुन पळु जात होते, त्यापैकी चार चौघांना मोठ्या सिताफिने पोलीसांनी पकडले.

ते रेकॉर्डवरील गुन्हेगार निघाले. त्यांना ताब्यात घेवुन चौकशी केली असता ते सर्वजन रस्त्यावरुन येणारे जाणारे वाटसरूंना थांबवुन त्यांना लुटण्यासाठी थांबले असल्याचे स्पष्ट झाले. पकडण्यात आलेल्या आरोपीत कमलेश उर्फ अशु पाटील लिंबापुरे (वय २२,रा. वसरणी नांदेड), आकाश जिवनसिंग ठाकुर (वय २९, रा. कौठा नांदेड), तेजपालसिंग ऊर्फ तेजा कुलवंतसिंग चहल (वय ३०, रा.जुना कौठा नांदेड) व देवीदास पिराजी माटे (वय २७, रा.अबचलनगर नांदेड) यांचा समावेश आहे. तर दोघेजन पळून जाण्यात यशस्वी झाले. पकडलेल्या चौघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याजवळ दोन देशी कट्टे (पिस्टल), एक मोबाईल, १७ जिवंत काडतुसे, दोन खंजर, दोन धारदार शस्त्र, नायलॉन दोरी, दोन मोटारसायकली असा एकुण १ लाख ४५ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असुन, तपास पोउपनि बालाजी नरवटे हे करत आहेत.

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या