19.6 C
Latur
Sunday, February 5, 2023
Homeनांदेडतामसा येथे एकाच रात्री चार दुकाने फोडली

तामसा येथे एकाच रात्री चार दुकाने फोडली

एकमत ऑनलाईन

तामसा : प्रतिनिधी
तामसा शहरातील भोकर रस्त्यावरील बाजारपेठेत अज्ञात चोरट्यांनी सोमवारी मध्यरात्री एकाची दविसी चार दुकाने फोडल्याने खळबळ उडाली असून व्यापा-्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.पोलीसानी घटनेची तातकाळ दखल घेवुन चोरट्याच शोध लावावा अशी मागणी व्यापा-याकडुन होत आहे.

अज्ञात चोरट्यांनी चारही दुकाने हमरस्त्याच्या बाजूने फोडली असून कुलूप तोडून शटर वाकवत रोख रक्कम व मुद्देमाल लंपास केला आहे. चोरट्यांनी शहरातील श्रीकृष्णा कलेक्शन फोडून त्यातील रक्कम व कापड गायब केला असून दुकानासमोरील मोकळ्या जागेत चोरट्यांनी कापड फेकून दिले. परिसरातील मोरया अ‍ॅग्रो एजन्सी व शेजारील गोडाऊनचे शटर अज्ञातांनी फोडले. याच भागातील स्वामी समर्थ ट्रेडिंग कंपनी फोडून त्यातील रक्कम पळविले असून दुस-या एका दुकानाचे दोन्ही कुलूप फोडून बाजूला फेकण्यात आले होते.

अज्ञातांनी याच भागातील एक दुचाकी गायब करून शेजारच्या शेतात सोडून पोबारा केला. या घटनेनंतर व्यापा-्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून पंधरवड्यापूर्वी याच भागातील निवासी वस्तीत दिवसा घरफोडी होऊन अंदाजे साडेचार लाखांची सोने व चांदीचे दागिने अज्ञात चोरट्यांनी गायब केल्याची घटना ताजी आहे. दुकानातील चो-्यांची तक्रार सायंकाळी उशिरापर्यंत झाली नसून फियार्दीनंतरच गुन्हा नोंदविला जाणार आहे.तामसा परीसरात गेल्या अनेक दीवसा पासुन चो-याचे प्रमान वाढले असुन पोलीसाच्या निशकाळजी पना मुळे चोरट्याचे मनोबल वाढले आहे. त्यामुळे राजरोस पने चोरीच्या घटना धडत आहेत त्या मुळे व्यापा-या मध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या