24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडजैनधर्मीय पार्श्वनाथिच्या मूर्तीवरून जुन्नी येतील राजकारण तापले

जैनधर्मीय पार्श्वनाथिच्या मूर्तीवरून जुन्नी येतील राजकारण तापले

एकमत ऑनलाईन

धर्माबाद : धर्माबाद तालुक्यातील मौजे जुन्नी येथील जैनधर्मीय पार्श्वनाथाच्या मूर्तीवरून काल दस-्याच्या दिवशी दोन गटातील राजकारण प्रचंड तापले असून त्या अनुषंगाने मूर्ती चोरून नेत असल्याची तक्रार धमार्बाद पोलीस ठाण्यात देण्यात आली असली तरी या संदर्भात अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही. धर्माबाद तालुक्यातील मौजे जुन्नी गाव हेमाडपंथी मंदिरांनी वेढले असून आजही येथे हिंदू व जैनधर्मीय मुर्त्या सापडतात. हजारो वर्षांची परंपरा असलेल्या या मुर्त्या अतिशय देखण्या व संस्कृती जपणा-या असून संस्कृतीचा वसाही या भागात होता हे दाखवत आहेत.

विष्णू महादेवाच्या मंदिरात पार्श्वनाथाची अतिशय प्राचीन देखणी मूर्ती असून ती जैन धर्मियांचे अस्तित्व सांगणारी आहे. त्या पार्श्वभूमीवर संबंधित मूतीर्चा जीर्णोद्धार करण्याचे धमार्बाद तसेच नांदेड जिल्ह्यातील जैनधर्मीय समाजाचे ठरवले होते. त्या अनुषंगाने जुन्नी गावांमध्ये आत्तापर्यंत गावक-यांना विश्वासात घेऊन दहा मिटिंग झाल्या. व ग्रामपंचायतीचा ठरावही झाला. हे सर्व होत असताना जिल्हा परिषद सदस्य दत्तू रेड्डी, विजय पाटील डांगे, धमार्बादचे जैन समाजाचे अनुप कासलीवाल.महेद्र पांण्डे.महावीर लोहाडे.सुनील गोधा, संतोष लुहाडे, चैतन्य सोनी. यांच्यासह जिल्ह्यातील अनेक जैनधर्मीय प्रतिष्ठित व्यापारी त्यांचे गुरू व गावातील प्रतिष्ठित नागरिकही उपस्थित होते. सर्वकाही ठरल्यामुळे दस-याच्या शुभमुहूर्तावर सदरील पार्श्वनाथाची मूर्ती ही शास्त्रीय दृष्टिकोनातून साफसफाई करण्यासाठी ताब्यात घेण्यासाठी जैन धर्मीय बांधव विष्णू महादेवाच्या मंदिरात गेले असता येथे प्रचंड गदारोळ झाला.

सदरील मूर्ती ही का काढत आहात असे गावक-यांचा म्हणणे होते पण गावातील बहुसंख्य प्रतिष्ठित नागरिकांच्या सहमतीनेच ही मूर्ती काढण्यात येत होती ही वस्तुस्थिती आहे. पण काही लोकांनी या संदर्भात राजकारण आणले व या गटातटाच्या राजकारणात सदरील मूर्ती चोरून नेण्यात येत असल्याची तक्रार धमार्बाद पोलीस ठाण्यात देण्यात आली. पण त्या गोष्टींमध्ये वा तक्रारीमध्ये काही तथ्य नसल्याचे बहुसंख्य गावक-यांचे म्हणणे असून धमार्बाद शहरातील प्रतिष्ठित जैनधर्मीय व्यापारी अनुप सेठ कासलीवाल महेद्र पांण्डे.संतोष लुहाडे यांच्या प्रतिक्रिया घेतल्या असता अशा जैन धर्मीयांच्या मुर्त्या वषार्नुवर्षे तशाच पडून आहेत, त्यामुळे त्यांचा जीर्णोद्धार करणे गरजेचे आहे.

त्या अनुषंगाने आम्ही गावक-यांची सहमती घेऊन व ग्रामपंचायत ठराव घेऊनच हे काम करत असून जुन्नी गावांमध्ये जैन धर्मियांचे मोठे मंदिर व धर्मशाळा उभारून गावाच्या वैभवात भर टाकण्याचे आम्ही नांदेड जिल्ह्यातील सर्व व्यापा-यांनी ठरवले होते. पण गावातील गटातटाच्या राजकारणामुळे या धार्मिक गोष्टीस विरोध होत असून ही अतिशय लाजिरवाणी घटनाअसल्याच्या प्रतिक्रिया त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी दिल्या.

उपरोक्त पार्श्वभूमीवर गावातील गटातटाचे राजकारण तापलेले असून या गोष्टीचा शेवट काय होईल याचा अंदाज देईनासा झाला. चौकट जुन्नी हे गाव हेमाडपंती मंदिरांनी वेढले असून अनेक देव-देवतांच्या मुर्त्या इथे आहेत. त्यातल्या त्यात जैन संस्कृती इथे जिवंत होती हे दाखवणा-या अनेक मूर्ती आहेत. पुरातन खात्याने येथे जर संशोधन केले असते तर येथे हिंदू जैन व बौद्ध संस्कृतीही होती असे निष्पन्न होईल. कारण आज घडीलाही बहुतांशी शेतात किंवा माळरानात उत्खनन झाले तर मोठ्याप्रमाणात मुर्त्या सापडण्याचे घटना चक्र चालूच आहे. पण पुरातन खात्याचे इकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे दिसत असून, दैनिक एकमतने यासंदर्भात अनेक वेळा बातम्या प्रकाशितही केल्या होत्या पण तिकडे पुरातन खात्याचे लक्षच नाही ही एक शोकांतिका आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या