24.2 C
Latur
Tuesday, November 30, 2021
Homeनांदेडपार्डीच्या शेतक-याच्या मुलीची आयआयटीमध्ये गगन भरारी

पार्डीच्या शेतक-याच्या मुलीची आयआयटीमध्ये गगन भरारी

एकमत ऑनलाईन

अर्धापूर : आपल्या शैक्षणिक जिवनात जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास यांचा सुरेख ताळमेळ साधून अर्धापूर तालुक्यातील पार्डी (म.) येथील एका शेतक-याच्या मुलीने जेईई अ‍ॅडव्हान्स परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून ती आयआयटी प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. तीच्याया यशाचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

अर्धापूर तालुक्यातील पार्डी ( म.) येथील प्रगतीशील शेतकरी गजानन दिंगबरराव भांगे पाटील यांचा पारंपारिक शेती व्यवसाय आहे. त्यांची मुलगी कु. गायत्री ही भारतीय तंत्रज्ञान संस्था तथा आय. आय. टी. प्रवेशासाठी पात्र ठरली असून ती देशातून चार हजार ७५२ वा क्रमांक घेऊन उत्तीर्ण झाली आहे. गायत्री भांगे हिचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण नांदेड शहरातील बाबानगर येथील महात्मा फुले शाळेत झाले आहे. त्यांनतर अकरावी – बारावीचे शिक्षण राजस्थान राज्यातील कोटा येथे पूर्ण केले आहे.

कोटा येथे आय. आय. टी. प्रवेशासाठी तयारी केली होती. दोन वर्षात सातत्याने कोरोना आणि लॉकडाऊन असल्यामुळे बहुतांश क्लास ऑनलाइन करावे लागले. त्यामुळे तीने घरी राहूनच संपूर्ण तयारी केली होती. शेवटी दि. १५ ऑक्टोबर रोजी जे. ई. ई. चा निकाल लागला. त्यात कु. गायत्री भांगे आय. आय. टी. प्रवेशासाठी पात्र ठरली आहे. तीच्या या यशाबद्दल माजी जिल्हा परिषद सदस्य रामराव भालेराव, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी स्वामी, भाजपाचे तालुका सरचिटणीस अवधुतराव पाटील कदम, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष नागोराव भांगे पाटील, भाजपा अल्पसंख्याक महामंत्री सय्यद युनूस पार्डीकर, वैद्यकीय आघाडी तालुकाध्यक्ष डॉ. संजय सोनटक्के, शिवसेना उपतालुका प्रमुख सदाशिव पाटील इंगळे, पत्रकार छगन पाटील इंगळे यांनी अभिनंदन केले आहे.

शेतक-याची मुलगी म्हणून मनस्वी आनंद गायत्री भांगे
मी आय. आय. टी. ला प्रवेश घ्यायचा. मी सातवीला असतानाच ठरविले होते. तेंव्हापासून मी रात्रंदिवस अभ्यास करून मोठ्या जिद्दीने कामाला लागले. केवळ पाच ते सहा तास झोप घ्यायची. इतर पूर्णवेळ अभ्यास करायची. या परिश्रमाला फळ मिळाले. आज एका शेतकरी कुटुंबातील मुलगी म्हणून मला मिळालेले यश याचा निश्चितच मोठा आनंद होत आहे. अशी प्रतिक्रिया गायत्री भांगे पाटील हिने दैनिक एकमतशी बोलतांना दिली आहे.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या