22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeनांदेडपारडी येथे जुगार अड्ड्यावर धाड

पारडी येथे जुगार अड्ड्यावर धाड

एकमत ऑनलाईन

नांदेड : जिल्ह्यात मागील काही दिवसापासून अवैध धंद्याना उत आला असून, मोठ्या प्रमाणात बेकायदेशीररित्या दारू, गुटखा विक्रीसह जुगार अड्डे सुरू आहेतÞ दरम्यान लोहा तालूक्यातील पारडी शिवारात पोलीसांनी धाड टाकून ३७ हजाराच्या मुद्देमालसह सहा जणांना ताब्यात घेतले आहेÞ

लोहा तालूक्यातील पारडी शिवारात असलेल्या डीकळे यांच्या पोल्ट्री फार्मच्या पाठीमागे एका जुगार अड्डयावर बेकायदेशीरित्या बावन पत्त्याचा तिर्रट नावाचा जुगार खेळाला जात होताÞदरम्यान सदर गुप्त माहिती पोलीसांना मिळताच पोलीसांनी सदर ठिकाणी धाड टाकून जुगार खेळणा-या सहा जणांना ताब्यात घेत ३७ हजाराचा मुद्देमालासह जुगाराचे साहित्य जप्त केलेÞ या प्रकरणी लोहा पोलीस ठाण्यात सहा जुगा-याविरूद्ध गून्हा दाखल करण्यात आला आहे

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या