निवघा बाजार : येथून जवळच असलेल्या मौजे शिरड येथे दि.९.रोजी कंपनी चा प्रचार व वस्तू विकण्याच्या नावाखाली एक झायलो कंपनीची गाडी घेवून तिन पुरुष व दोन मुली शिरड येथे दाखल झाल्या नागरीकांना बोलावून कंपनीच्या सामान खरेदी बदल माहीती देवून त्या घरगुती उपयोगासाठी कशा फायदयाच्या आहेत ह्या पटवून देवून तुम्ही ह्या वस्तू नगदी खरेदी करु शकता अथवा दोनशे रुपयामध्ये बुकिंग ही करू शकता बुकिंग केलेल्यांना वस्तू घेण्याचा कालावधी एक वर्षापर्यंत राहणार असून एक वर्षा नंतर त्यांना त्या बुकिंगवर वस्तू घेता येणार नाहीत कीती लोकांची ह्या भामटयांनी फसवणुक केली हे आतापर्यंत कळले नाही.
बुकिंगचे पैसे सुध्दा परत मीळणार नाहीत. पहील्या पाच नगदी खरेदी करणा-्या नागरीकांना पाच हजार दोनशे नव्वद मध्ये गॅस सेफ्टी मीटर जे गॅस कीती टाकीमध्ये शिल्लक आहे ते दाखवतो व पाईप कट असल्यास गॅस पुर्णपणे ह्याच्या मुळे बंद होतो तसे प्रात्यक्षिक त्यांनी खरेदी करणा-्या नागरीकांच्या घरी दाखवले त्याच बरोबर एक पावर सेवर ( विजमीटर च्या बाजूला बसवण्यासाठी) व ९९९ रूपयांची सुट व त्यामध्ये ७५ लाखांचा विमा यांच्या गॅससाठी घेतलेल्या वस्तूमुळे अपघात झाला तर खरेदीदारांना मिळेल तसेच पहील्या पाच खरेदीदारांना यांच्या बरोबर भेट वस्तू म्हणुन फुकट तिन बर्णलवाली गॅस शेगडी ज्यांची बाजारात किंमत चार हजारांच्या वर आहे कुलर,एलईडी,फ्रिज ह्या महागडया वस्तू पैकी खरेदीदारांना जे पाहिजे ते खरेदी केल्यावर भेट म्हणून कंपनी कडून फुकट दिल्या जाईल तसे महागडया वस्तूचे फोटो मोबाईल मध्ये दाखवून गोडावून मध्ये असल्याचे सांगुन ह्याच वस्तू देणार असल्याचे आमिष शिरड येथील नागरीकांना दाखवून दोन कमी किमतीच्या वस्तू देवून बाकीचे काही बुकिंग करुन व काहीना तुम्ही पहील्या पाच खरेदीदारामध्ये येता असे म्हणून ब-्याच नागरीकांकडून प्रत्येकी चार ते पाच हजार रुपये ह्या भामट्यांनी नेल्याचे समजते त्यामध्ये दोन तरुणीचा सुध्दा समावेश आहे.
आज वस्तू घेवून येतील उद्या घेवून येतील म्हणुन नागरीक वाट पाहत होते. महीना होत आला तरी ते येत नाहीत दिलेला मोबाईल नंबरही लागत नाही लागला तर उचलत नाहीत त्यांनी फसवणुक केल्यांचे लक्षात आल्यानंतर येथील दोन नागरीकांनी पता काढून पिंपरखेड येथील एका सबंधित व्यक्ती कडून पैसे परत आणल्याचे कळते पण कीती लोकांची ह्या भामटयांनी फसवणुक केली हे आतापर्यंत कळले नाही. फसवणुक झालेल्या एका व्यक्तीनी माहीती दिली असून माझे पैसे मी वसूल केले असून बाकीच्या नागरीकांचे पैसे त्यांनी घेतले व वस्तू दिल्या नसून दिलेल्या बिलावर पुणे येथील पत्ता असून त्यांचा फोन सुद्धा लागत नाही. नागरीकांची फसवणूक झाली असून येथील नागरीक संबंधीत भामट्यांच्या विरोधात पोलीसात तक्रार देण्याच्या तयारीत आहेत. अशा कोणत्याही आमिषाला बळी पडू नये असे फसवणुक झालेल्या शिरड येथील नागरिकांनी सांगीतले आहे.
लोदग्यातील अलमॅक टिशू कल्चर लॅबला भारत सरकारची मान्यता